शहरातील साळवी स्टॉप येथे कार- रिक्षा व दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघात झाला यामध्ये रिक्षा चालक व दुचाकीस्वार जखमी झाले असून रिक्षाचालकाला अपघातात गंभीर दुखापत झाली असल्याच सांगण्यात आले आहे, हा अपघात गुरूवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकरणी कारचालकाविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रिक्षाचालक रियाज अहमद शेगळे (रा. टी.जी.शेट्येनगर, रत्नागिरी) व दुचाकीस्वार दत्ताराम सदानंद सुर्वे (५८, रा भाटये जोयनाकवाडी रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
यापकरणी दत्ताराम सुर्वे यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत कारचालकाविरूद्ध तकार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कारचालक श्वेतांग पदीप वायंगणकर (रा खेडशी गयाळवाडी, रत्नागिरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दत्ताराम सुर्वे हे गुरूवारी रात्री ज़े के फाईल्स येथून कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून भाट्ये येथे आपल्या घरी जात होते. रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास ते साळवी स्टॉप येथे आले असता त्यांच्या समोर असलेली रिक्षाला कारने समोरून धडक दिली.
या अपघातात रिक्षा मागे येवूनं दुचाकीवर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दत्ताराम सुर्वे हे रस्त्यावर पडून जखमी झाले. तर रिक्षाचालक रियाज शेगळे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने जवळील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्यापकरणी श्वेतांग वायंगणकर याच्याविरूद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.