28.2 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

कांदळवन कार्यशाळेच्या खर्चाची चौकशी करा – पालकमंत्री उदय सामंत

कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये...

रत्नागिरीत पोलिस दलात मोटारीसह ई-बाईक दाखल

पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग वापर जनतेसाठी करावा,...

रत्नागिरीतही आता हाऊसबोटी – पालकमंत्री उदय सामंत

काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी दाखल झाल्या...
HomeKhedढोल-ताशांच्या गजरात 'छावा' फेम विकी कौशल रायगडावर !

ढोल-ताशांच्या गजरात ‘छावा’ फेम विकी कौशल रायगडावर !

किल्ले रायगडावरील राजदरबार येथील शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून वंदन' केले.

किल्ले रायगडावर बुधवारी पारंपारिक पद्धतीने तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने रायगडावर आलेल्या शिवप्रेमींकडून शिवछत्रपतींच्या घोषणेने रायगड दुमदुमून गेला. या प्रसंगी शिवजयंतीचे औचित्य साधून सिनेअभिनेते विकी कौशल हे देखील रायगडावर उपस्थित होते. त्यांनी किल्ले रायगडावरील राजदरबार येथील शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून वंदन’ केले. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर बुधवारी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.

ज्योत प्रज्वलित – दरम्यान राज्याच्या विविध ठिकाणांहून हजारो शिवप्रेमी शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी किल्ले रायगडावर दाखल झाले होते. शिवजयंतीच्या आदल्या दिवशीच म्हणजे मंगळवारपासूनच विविध ठिकाणांहून शिवप्रेमी किल्ले रायगडावर येवून ज्योत प्रज्वलीत करून छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत जाताना या दरम्यान पाहायला मिळाले.

पोलिसांची मानवंदना – शिवजयंतीचे औचित्य साधून रायगड पोलीस दलाकडून किल्ले रायगडावरील राजदरबारासमोर शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे, आ.अनिकेत तटकरे, महाडचे तहसिलदार महेश शितोळे, डिवायएसपी शंकर काळे यांच्यासह अन्य शासकिय अधिकारी तसेच ठिकठिकाणांहून आलेले शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकी कौशलचे अभिवादन – छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यसाठी भोगलेल्या यातनांपुढे आमची मेहनत काहीच नसल्याचे प्रतिपादन छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल यांनी शिवजयंती निमि त्ताने किल्ले रायगडावर आले असताना केले. राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे स्वराज्य सप्ताह निमित्ताने किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव व गड परिसराची स्वच्छता व साफसफाई म ोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल यांना किल्ले रायगडावर अभिवादन करण्याची संधी मिळाली होती. विकी कौशल यांनी महाराजांपुढे नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले.

कवड्यांची माळ – या प्रसंगी गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. मेघडंबरी परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच होळीचा माळ येथे पारंपारिक ढोलताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष सुरू होता. यावेळी राजसदरेवर मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते विकी कौशल यांचा कवड्यांची माळ व तलवार तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा भेट देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला.

हे माझे सौभाग्य – ना. आदिती तटकरे यांच्या माध्यम ातून किल्ले रायगडावर येण्याची संधी प्राप्त झाल्याने विकी कौशल यांनी आदिती तटकरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, वितरक दिनेश विजन, अभिनेता संतोष जुवेकर आदी. उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते विकी कौशल यांनी, अनेक वर्षापासूनची मांझी किल्ले रायगडावर येण्याची इच्छा आज पूर्ण झाली. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणे हे मी माझे सौभाग्य समजतो. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुन्हा येऊ ! – सकाळी ११ वाजता विकी कौशलसह छावा टीमच्या बहुतांश सदस्यांचे हेलिकॉप्टरने रायगडाच्या पायथ्याशी आगमन झाले व तेथून रायगड रोपवेने ही टीम किल्ले रायगडावर दाखल झाली. रायगड रोपेच्या पायथ्याशी विकी कौशल यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले. रोपवेची सेवा पाहून विकी कौशल यांनी आपण पुन्हा आपल्या कुटुंबासमवेत गडावर येऊ असे येथील मान्यवरांना आश्वासन दिले. दरम्यान या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगात सर्वत्र पोहोचेल, असा विश्वास त्यांती या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular