22.5 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriपतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख तरी चित्रा वाघांनी वाचायला हवा होता

पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख तरी चित्रा वाघांनी वाचायला हवा होता

या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला असून, माफी मागा अन्यथा पुन्हा रत्नागिरीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांना दिला आहे.

चार दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध पतित पावन मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. यासमयीचे काही फोटो त्यांनी ट्विट केले. हे मंदिर स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी बांधल्याचा दावा त्यांनी ट्विटमधून केला. याच दाव्यावर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख तरी चित्रा वाघांनी वाचायला हवा होता, असं म्हणत चित्रा वाघ यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

रत्नागिरीतील सर्व धर्मियांच प्रेरणास्थान असलेले पतितपावन मंदिर भागोजीशेठ कीर यांनी बांधले असून त्यांच्या नावाचा तेथे उल्लेख ही न करता या मंदिरासंबंधीची धादांत खोटी माहिती देताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मंदिर बांधल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन सांगितलं. “स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे भारतातील पहिले मंदिर…”, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं. या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला असून, माफी मागा अन्यथा पुन्हा रत्नागिरीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांना दिला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटखालीही अनेकांनी त्यांनी खोटं ट्विट केल्याचा आरोप केला आहे.

भागोजीशेठ कीर हे मोठे दानशूर होते. त्यांनी मुंबईमध्ये स्वःखर्चाने ९ एकर भूखंड विकत घेऊन हिंदू स्मशानभूमीसाठी सरकारला हे भूखंड दान केले. अनेक शाळा, धर्मशाळा, मंदिरं, गोशाळा बांधून दान केल्या. रत्नागिरीतलं हे मंदिर देखील त्यांच्याच पुढाकारातून साकारलं आहे. त्यामुळे कीर यांचं कार्य दुर्लक्षित करून सावरकरांच्या नावावर खपवू नये, असं आवाहन राष्ट्रवादीने चित्रा वाघ यांना केलं आहे.

महाराष्ट्रात दानशूरांच्या यादीत भागोजीशेठ कीर यांचं मोठं नाव आहे. त्यामुळे कीर यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हिंदू महासभेने पतितपावन मंदिरात त्यांच्या हयातीतच कीर यांचा पुतळा मध्यभागी उभारला. त्यामुळे चित्रा वाघ यांनी भागोजीशेठ कीर यांचे कार्य दुर्लक्षित करून सावरकरांच्या नावावर नसेल्या गोष्टी खपवू नयेत. त्यांच्या पक्षाकडे जर खरा इतिहास असेल तर सावरकर यांनी समाजकल्याणरूपी एकतरी पाणवठा बांधून दिला असेल तर तो जनतेला दाखवून द्यावा, अन्यथा माफी मागावी, अशी मागणी शेट्ये यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular