26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriजीवंत खवले मांजरासह एकाला अटक

जीवंत खवले मांजरासह एकाला अटक

एक व्यक्ती खवले मांजराला मोटारसायकलवरून घेवून जात असल्याची गोपनीय माहिती देवरूख पोलीसांना मिळाली.

संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावर देवालय याठिकाणी विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई देवरूख पोलीस आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली.रविवारी रात्री १०.४५ वा. ही कारवाई करण्यात आली. त्याला सोमवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ललित सतिश सावंत वय-२५, मुळ रा. मेघी पवारवाडी, ता. संगमेश्वर, सध्या रा. पालघर असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील देवळे फाटा ते देवळे गाव जाणाऱ्या रस्त्यावर देवालय याठिकाणी एक व्यक्ती खवले मांजराला मोटारसायकलवरून घेवून जात असल्याची गोपनीय माहिती देवरूख पोलीसांना मिळाली. देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपले सहकारी हे. काँ. सचिन भुजबळराव, हे. काँ. संतोष सडकर, पो. काँ. ज्ञानेश्वर मांढरे, पो. काँ. रोहित यादव, पो. काँ. रीलेश कांबळे तसेच देवरूख वनविभागाचे वनरक्षक न्हानू गावडे आदिंसह देवळे रस्त्यावर जावून त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याजवळ एका सिमेंटच्या रिकाम्या पोतळीत जीवंत खवले मांजर आढळून आले.

यानंतर त्याला खवले मांजरासहीत ताब्यात घेवून देवरूख पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची पोलीसांनी सखोल चौकशी केली असता तो तालुक्यातीलच मेघी पवारवाडीतील ललित सतिश सावंत असल्याचे सांगितले. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४८ अ, ५१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर खवले मांजराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. ललितला सोमवारी देवरूख न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर खवले मांजराला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

RELATED ARTICLES

Most Popular