24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriजिल्ह्यात सीएनजीच्या नियमित पुरवठ्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

जिल्ह्यात सीएनजीच्या नियमित पुरवठ्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

इंधनाच्या किमती गगनभेदी झाल्यामुळे अनेकांनी आपल्या इंधनाच्या गाड्या विकून त्याऐवजी सीएनजी इंधनावर चालणाऱ्या गाड्या घेतल्या.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच सीएनजीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. ऐन शिमग्यामध्ये तर प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत होता. इंधनाच्या किमती गगनभेदी झाल्यामुळे अनेकांनी आपल्या इंधनाच्या गाड्या विकून त्याऐवजी सीएनजी इंधनावर चालणाऱ्या गाड्या घेतल्या. परंतु, सततच्या असणाऱ्या कमी पुरवठ्यामुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे सीएनजीचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

रत्नागिरी शहर व तालुक्यामधील रिक्षा व्यावसायिकांना तसेच खाजगी सीएनजी वाहनधारकांना सीएनजीचा होणारा अनियमित पुरवठा, तो भरण्यासाठी लागणारा प्रचंड वेळ व कमी प्रेशरने मिळणारा सीएनजी, त्यामुळे बिघडणारे गाड्यांचे ऍव्हरेज, रत्नागिरी सिएनजीची असणारी अत्युच्च किंमत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रत्नागिरी यांच्यातर्फे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. गॅस संदर्भातील पंपांबाबत योग्य निर्णय घेवून गॅसचे वितरण मुबलक व २४ पास गॅस पंप सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोरोना काळामध्ये अनेक तरुण बेरोजगार झाले. मुंबई पुणे इतरत्र बाहेर असलेल्या अनेकांची नोकरी गेल्याने अनेकांनी रिक्षाचा व्यवसाय सुरु केला. सीएनजी वर चालणारी रिक्षा असल्याने इंधनापेक्षा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत झाली. देशातील सर्वसामान्यांपासून सुशिक्षितांपर्यंत स्वतंत्र व स्वावलंबी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने व बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने कर्ज काढून अनेकांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. या रिक्षा व्यवसायातून अनेक बेरोजगार तरूण आपल्या कुटुंबाचे तारणहार बनले आहेत. परंतु आजच्या घडीला पेट्रोलच्या अनियमित पुरवठ्यामुळे आणि भरमसाठ दरवाढीमुळे या रिक्षा मालक चालकांना जगणे मुश्कील झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular