24.4 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeMaharashtraनवनीत राणांच्या बनावाचे पितळ अखेर उघडे, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे...

नवनीत राणांच्या बनावाचे पितळ अखेर उघडे, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे विशेष ट्विट

आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला खार पोलिसांनी हीन दर्जाची वागणूक दिली. असा गंभीर आरोप करणाऱ्याच्या आरोपांचं पितळं उघडं पडण्याची चिन्हे आहेत.

पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्यांवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला होता. खार पोलीस ठाण्यात आलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेक केली होती. तसेच चप्पल आणि बाटल्याही भिरकावल्या होत्या. दरम्यान, यावेळी सोमय्यांच्या ड्रायव्हरने घाईगडबडीत तिथून गाडी काढली होती. मात्र आता सोमय्यांच्या ड्रायव्हरवर शिवसैनिकांवर गाडी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी आपल्याला पिण्यासाठी पाणी दिलं नाही ना वॉशरुमला जाऊ दिलं. तसेच पोलीस कर्मचाऱ्याने आपण मागासवर्गीय असल्यानं आपणास पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी खार पोलिसांवर केला होता. आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला खार पोलिसांनी हीन दर्जाची वागणूक दिली. असा गंभीर आरोप करणाऱ्याच्या आरोपांचं पितळं उघडं पडण्याची चिन्हे आहेत.

पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला नक्की कशी वागणूक दिली गेली याचा व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ट्विट करताना “यापेक्षा आम्हाला अधिक स्पष्ट काही सांगायची गरज वाटत नाही”, असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.

नवनीत राणा यांनी काल हा आरोप केला होता त्यानंतर आज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची एक क्लीप ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी दिलेला चहा बोलत संपविताना दिसत आहेत. हा व्हिडिओच सर्व काही सांगत असल्याचं संजय पांडे यांनी सूचकपणे म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular