कशेडी घाडातील बोगद्यातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्यानंतर कोकणासह गोव्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. परशुराम घाटातील वाहतुकीचा फज्जा उडत असताना सर्वात मोठ्या कशेडी बोगद्यातून तरी सुखाने जाता येणार, यामुळे कोकणी जनतेत समाधान व्यक्त होत आहे. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरुदे म्हणजे झाले, असेही प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.महामार्गातील एका पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा टप्प्याचे काम पूर्ण होईल. यामध्ये कशेडी बोगद्यातून सिंगल लेन सुरू होईल,असे बांधकाम मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे. परशुराम घाटात माती कोसळल्यामुळे ती माती काढून तेही पूर्ण होईल.
कोस्टल रोडचाही आढावा घेतला. नॅशनल हायवेसाठी एक मुख्य कार्यालयाला हवे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते मान्य झाले होते. मात्र, आता त्याची जागा बेलापूर येथे निश्चित झाली आहे. नागपूर, गोवा त्याचबरोबर इतर राज्य व ग्रामीण रस्त्यांचाही आढावा घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.