26.7 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriरत्नागिरीतील तरुणाची लाखोंची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरीतील तरुणाची लाखोंची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी येथील एका तरुणाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये सुमारे पावणेतीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.

कोरोनामुळे सध्या अनेक तरुण, तरुणी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे कुठे नोकरी मिळेल यासाठी सर्वच जण प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामध्येच एखादा ओळखीने नोकरीला लावतो सांगणारा फोन आला तर एक प्रकारे मानसिक आधार मिळतो. परंतु अशा येणाऱ्या फोनवर किती प्रमाणात विश्वास ठेवावा याबाबत निट विचार करणे गरजेचे आहे.

रत्नागिरी येथील एका तरुणाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये सुमारे पावणेतीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राहुल शर्मा यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ डिसेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये घडली. फिर्यादी शुभम केदारनाथ मणियार वय २७, रा. कांचनसूर्या अपार्टमेंट नाचणे, रत्नागिरी याने याविरोधात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, संशयिताने शुभमला इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी आपल्या वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर अंधपणे विश्वास ठेवून शुभमने राहुल शर्माच्या खात्यात पैसे जमा केले. परंतु २ लाख ८४  हजार ८७७ रुपये देऊनही नोकरी न मिळाल्याने, अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुलने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिकचा तपास शहर पोलीस करत आहेत.

घडलेल्या घटनेमध्ये अज्ञात राहुल शर्मा या नावाने शुभम केदारनाथ मिनीयार याच्या मोबाईलवर फोन आला. समोरून तुम्हाला इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये कामाला लावतो सांगण्यात आले. परंतु, या प्रक्रियेसाठी आपल्याला काही रक्कम भरावी लागेल. त्याच्या या बोलण्यावर आणि चांगली नोकरी मिळेल या आशेला भुलून तरुणाने एसबीआय बॅक,  बँक ऑफ बडोदा, एच.डी.एफ.सी., फिनापेमेंट बॅक,  जनता सहकारी बँक अशा ५ वेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळया अकाउंटवर एकूण २ लाख ८४ हजार ८७७ रुपये भरण्यास सांगितले.

आणि त्याप्रमाणे या तरुणाने पैसे भरले. पैसे भरून त्याच्याकडे नोकरीविषयी विचारल्यानंतर समोरून समाधानकारक काहीच उत्तर मिळत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शुभम याने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार राहुल शर्मा याच्यावर भादवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular