22.9 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriकेवळ ३१ परवानाधारक पर्ससीन नौका, जिल्ह्यात २१९ नौका नूतनीकरणाविना

केवळ ३१ परवानाधारक पर्ससीन नौका, जिल्ह्यात २१९ नौका नूतनीकरणाविना

जिल्ह्यातील मत्स्यखात्याकडे नोंदणी असलेल्या एकूण २५० पर्ससीन नौका आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारपासून पर्ससीन मासेमारीला सुरवात झाली. २५० पर्ससीन नौकांची नोंदणी मत्स्य विभागाकडे आहे; परंतु त्यापैकी फक्त ३१ पर्ससीनधारकांच्याच परवान्याचे नूतनीकरण झाले आहे. परवाना नूतनीकरण २०२१ पासून स्थगित असल्याने उर्वरित २१९ पर्ससीनधारक विनापरवाना आहेत. विनापरवाना मासेमारी जास्त होण्याची शक्यता आहे. यावर मत्स्य आयुक्त लक्ष ठेवून आहेत. एलईडी मासेमारी आणि बाहेरून नौका आणून मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक मत्स्य आयुक्त अभय शिंदे यांनी दिला.

पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या मासेमारीचा हंगाम आजपासून सुख झाला; परंतु सुरू होतानाच पर्ससीन नेटधारक अडचणीत सापडले आहेत. पर्ससीनधारकांचे नूतनीकरणाचे प्रस्ताव असले तरी गोपाळ कृष्ण समितीच्या अहवालानुसार पर्ससीन मासेमारीच्या परवाना नूतनीकरणाला २०२१ मध्ये स्थगिती दिली आहे. त्यामुळे पर्ससीनधारकांचे परवाने रखडले आहेत. जिल्ह्यातील मत्स्यखात्याकडे नोंदणी असलेल्या एकूण २५० पर्ससीन नौका आहेत. परवान्याचे नूतनीकरण .: झालेल्या फक्त ३१ पर्ससीन नौका आहेत. उर्वरित २१९ नौका विनापरवाना आहेत.

या विनापरवाना पर्ससीन नौकांवर मत्स्य आयुक्त कार्यालय कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे; परंतु हे पर्ससीनधारक महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्राबाहेर म्हणजे १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर केंद्राच्या हद्दीमध्ये मासेमारी करतात. त्यामुळे तेथे कारवाई करण्याबाबत मर्यादा येतात, असे मत्स्यखात्याने सांगितले आहे.

त्या नौकांवर कारवाई करू – नव्या हंगामासाठी जिल्ह्यातील पर्ससीन नौका आणून मासेमारी काही व्यावसायिकांनी बाहेरून भाड्याने करणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत मत्स्य खात्याने स्पष्ट केले की, जर आपल्या हद्दीत नोंदणी नसलेल्या नौका आणून मासेमारी केली गेली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. एलईडीलाही शासनाने बंदी घातली आहे. मग ती कुठेही एलईडीद्वारे मासेमारी झाली तर आम्ही त्यावर कारवाई करू, असा इशाराही सहाय्यक मत्स्य आयुक्त अभय शिंदे यांनी दिला. त्यामुळे या हंगामातील मासेमारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular