27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriशहरवासीयांना पाण्यासंबधी धोक्याची घंटा, शीळ धरणात ६० टक्केच साठा

शहरवासीयांना पाण्यासंबधी धोक्याची घंटा, शीळ धरणात ६० टक्केच साठा

शीळ धरणात सध्या २.०५१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.

शहरवासीयांना आतापासूनच पाणी जपून वापरावे लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये फक्त ६० टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातील साठ्यापेक्षा ०.१३३ दशलक्ष घनमीटरने पाणीसाठा कमी आहे. कमी पर्जन्यमानाचा हा परिणाम आहे. त्यात आगामी कडक उन्हाळ्यात पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनाचा विचार करता पालिका आणि शहरवासीयांना पाण्याच्या काटकसरीबाबत नियोजन करणे अनिवार्य बनले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ या मुख्य धरणातील पाणीसाठ्याची ही परिस्थिती आहे. शीळ धरणात सध्या २.०५१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा हा ५० टक्के शिल्लक आहे.

गेल्या हंगामात मान्सूनवर अल्निनोचा राहिलेला प्रभाव व झालेल्या कमी पर्जन्यमानाने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी वाढत्या उन्हाळ्याच्या काळात तापमानातील चढ-उतार व त्यामुळे पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला शीळ धरण, पानवल धरण आणि नाचणे येथील तलाव या तीन स्रोतांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला दररोज १९ ते २० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३०१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे; पण शीळ धरणात सध्या २.०५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे हा पाणीसाठा पाहता आगामी काळासाठी शहरवासियांवर काटकसरीने पाणीवापर करण्याची वेळ येणार आहे.

पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेवर सुमारे ७३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही पाणीयोजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी होणाऱ्या या योजनेतून ३० ते ४० टक्के पाणी गळती थांबली आहे. शहरात सुमारे १० हजार २८८ हून अधिक नळजोडण्या आहेत. त्या नागरिकांना प्रतिदिन १९ ते २० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणाची दुरुस्ती रखडली आहे. नाचणे येथील पाणीपुरवठा केंद्राच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शहराला एकट्या शीळ धरणातून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. अजून तीव्र उन्हाळ्याला सुरवात होणे बाकी आहे. मार्चपासून सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्यावर पाणीसाठ्यावर परिणाम होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular