25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeChiplunपरशुराम घाटातील कामाची गती मंदावली

परशुराम घाटातील कामाची गती मंदावली

दरडीच्या बाजूने केलेल्या भरावावर पावसाळ्यापूर्वी दगडी पिचिंग करणे आवश्यक आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दुसऱ्या लेनचे काम पूर्ण झाले तरीही अद्याप दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी दरडीच्या बाजूने केलेल्या भरावावर पावसाळ्यापूर्वी दगडी पिचिंग करणे आवश्यक आहे. परशुराम घाटातील काम अतिशय मंद गतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली १७ वर्षे रखडले आहे. ‘नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न’ याप्रमाणे हे काम अजूनही पूर्णत्वास जात नाही. परशुराम घाटात तर अनेक अडथळ्यांचे डोंगर उभे राहिले.

या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच टेकडीवर आणि दरीच्या पायथ्याला नागरी वस्ती आहे. पावसाळ्यात दोन्ही बाजूने दरडी कोसळत असल्याने परशुराम घाटातील वाहतूक धोकादायक झाली होती. येथील डोंगरकटाईचे काम तीन ते चार वर्षे सुरू होते. परशुराम घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणचा कातळ फोडण्यात बराचसा कालावधी निघून गेला. या ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेली दरड हटवण्याचे कामही अनेक दिवस सुरू होते. ही संपूर्ण दरड हटवून लगतच्या डोंगरकटाईचे काम पूर्ण करण्यात आले.

यानंतर आता आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारून परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीस खुली केली आहे. दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते; परंतु आता या कामाची गती पूर्णपणे मंदावली आहे शिवाय रस्त्यावरही अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाला तडे गेले आहेत; परंतु काही मोजक्याच भागात आधीचे काँक्रिटीकरण तोडून पुन्हा काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणखी रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची सूचना – परशुरामवासीयांनी विविध मागण्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केल्या होत्या, त्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. त्यानुसार प्रशासनाने त्याची पाहणीदेखील केली होती; मात्र अद्याप या कामांना सुरवात झालेली नाही. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेत पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची सूचना केली होती; मात्र कामांची गती मंद राहिल्याने पावसाळ्यानंतरही महामार्गाची कामे सुरू राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular