31.9 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गावे धोकादायक अतिवृष्टीच्या काळात केले जाणार सर्वेक्षण

अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात अनेकवेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण...

आरेतील ५० गुंठ्यांवर कांदळवन रोपवन

किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी...

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...
HomeRajapurरिफायनरीबाबत विरोधक गैरसमज पसरवताहेत प्रकल्पग्रस्त जनतेशी चर्चा करन्यास तयार : ना.सामंत

रिफायनरीबाबत विरोधक गैरसमज पसरवताहेत प्रकल्पग्रस्त जनतेशी चर्चा करन्यास तयार : ना.सामंत

राजापूर तालुक्यातील बारसू औद्योगिक वसाहतीतील नियोजित रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी केला आहे. त्याचबरोबर तेथील जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तेथे पाठवले जाईल. आवश्यकता वाटल्यास मी स्वत: जाऊन तेथील नागरिकांशी चर्चा करेन, असेदेखील ना. सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि डिएसपी धनंजय कुलकर्णी हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी ना. सामंत म्हणाले की, या भागातील मातीचे नमूने घेतले जात आहेत. १०० ठिकाणी नमुने घ्यायचे आहेत. सध्या २० ठिकाणचे नमुने घेतले गेले आहेत. ३६ ठिकाणी संमत्ती मिळाली आहे. ४२ ठिकाणांची संमती मिळायची आहे. ज्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प उभा राहत आहे ती जागा योग्य आहे की नाही याचा निर्णय माती परीक्षण अहवालातून मिळेल. त्यादृष्टीने हे नमुने संकलीत केले जात आहेत. रिफायनरी येथे उभारायची की नाही याचा निर्णय माती परीक्षणाच्या अहवालानंतरच होऊ शकेल. विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. अहवाल योग्य असेल तर प्रकल्प होईल. जमिनीबाबतचा मोबदला देण्याचा निर्णय त्यांनंतर घेतला जाईल.

दरम्यान, जिल्ह्यामध्ये लवकरच कोको कोला कंपनी सुरू होईल असे देखील ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एमआयडीसीमधील शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत ज्या जमिनी पूर्वी संपादित झाल्या आहेत, खरेदीखत झाली आहेत त्यांच्या डी नोटिफिकेशनची अंमलबजावणी केली जाईल. वाटद येथे येणाऱ्या प्रकल्पाबाबतही अशीच भूमिका असेल. मँगो पार्क प्रकल्प निवेंडीमध्ये, हर्णेमध्ये मरिन पार्क प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. याबाबत उच्चाधिकार समिती लवकरच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. जमीन संपादित करताना जनतेला वेठीस धरले जाणार नाही असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.रत्नागिरी शहरालगत बाळासाहेब सावंतांचे स्मारक पूर्ण झाले असून येथे पोलीस विभागाला आपत्कालीन यंत्रणेकरिता आवश्यक ते प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, असेही ना. सामंत म्हणाले. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी वसाहत उभारण्या करिता १६० कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसात रत्नागिरीत येऊन करतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular