28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedखेड कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

खेड कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

खेडचे सुपुत्र आणि मुंबईस्थित उद्योजक कौस्तुभ बुटाला यांनी या प्रकल्पासाठी मोठे सहकार्य केले आहे.

खेड नगरपालिका रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत खेड नगरपालिका रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी आपले जीव गमावले होते. ही वेळ पुन्हा ओढवू नये यासाठी खेड तालुक्यामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर येथील नगरपालिका दवाखान्यात कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असल्याची जाणवल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान हे कोविड सेंटर रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरले आहे. तालुक्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनाफ्री झाले.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाही अजूनही कोविड सेंटरमध्ये काही कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे हे कोविड सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे ठरले आहे. सद्य स्थितीत  कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरीही सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर तिचा सामना करण्यासाठी खेड प्रशासनाने आधीपासूनच पूर्वतयारी करायला सुरुवात केली आहे.

खेडचे सुपुत्र आणि मुंबईस्थित उद्योजक कौस्तुभ बुटाला यांनी या प्रकल्पासाठी मोठे सहकार्य केले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून नगरपालिका कोविड सेंटर येथेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular