25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeKhedदिव्यांग राष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांची इंटरनेशनल पॅरा ओपन गेम्समध्ये बाजी

दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांची इंटरनेशनल पॅरा ओपन गेम्समध्ये बाजी

सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशेहून अधिक महिला व पुरुष दिव्यांग खेळाडूंना एकत्र करून खेळाडूंसाठी दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे एक प्रकारे नवीन व्यासपीठच उपलब्ध करून दिले आहे.

दि. २४ ते २६ ऑगस्ट मालदीव येथे इंटरनेशनल पॅरा ओपन गेम्स २०२१ या दिव्यांग खेळाडूंच्या आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेड येथील राष्ट्रीय खेळाडू प्रशांत महेंद्र सावंत यांची निवड झालेली. त्यामध्ये त्यांनी गोळाफेक प्रकारात सुवर्ण, तर थाळीफेकमध्ये रौप्य त्यांनी पदक पटकावून रत्नागिरीचे नाव उज्वल केले आहे.

प्रशांत सावंत हे गेली दहा वर्षे दिव्यांग खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत असून, त्यांनी विविध प्रकारामध्ये अनेक पारितोषिके मिळविली आहेत. सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशेहून अधिक महिला व पुरुष दिव्यांग खेळाडूंना एकत्र करून खेळाडूंसाठी दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे एक प्रकारे नवीन व्यासपीठच उपलब्ध करून दिले आहे.

विविध प्रकारातील दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धा व शिबिराचे आयोजन करून खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमधून सहभागी होण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न आणि मदत करत असतात. महाराष्ट शासनमान्य महाराष्ट्र अपंग कर्मचारी अधिकारी संघटना शाखा रत्नागिरी यांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील तळमळीची दखल घेऊन त्यांना “रत्नागिरी जिल्हा अपंग गुणिजन” या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच खेळाडूंसाठी असणारा मानाचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरीद्वारा “रत्नागिरी जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्काराने” देखील गौरवण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कंझ्युमर राईट्स ऑर्गनायझेशन यांनी देखील प्रशांत सावंत यांच्या लाखमोलाच्या कार्याची दखल घेत “राज्यस्तरीय आदर्श क्रीडा रत्न” हा पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मालदीव येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रशांत सावंत हे पहिलेच दिव्यांग खेळाडू आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनपर कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular