28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeChiplunदोन्ही बाजूने अवजड वाहने सोडल्याने परशुराम घाट जाम, दीड तास वाहतुकीचा खोळंबा

दोन्ही बाजूने अवजड वाहने सोडल्याने परशुराम घाट जाम, दीड तास वाहतुकीचा खोळंबा

मागील वर्षीच्या पावसाने खचलेल्या परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणांतर्गत संरक्षक भिंत उभारण्याचे काम प्रथम प्राधान्याने सुरू आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी परशुराम घाटाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम मोठ्या वेगाने सुरु आहे. या महामार्गाच्या कामासोबतच नियमित होणारी वाहतूक सुद्धा सुरूच आहे. त्यामुळे कामासाठी उतरविलेले सामान रस्त्यावरच असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर काही वेळेला एकत्र लागून सुट्ट्या आल्या तर मात्र महामार्गावर लांबच्या मंब वाहनांच्या रांगाच लागलेल्या असतात. काल सुद्धा अचानक वाहनांची संख्या वाढल्याने सुरु असलेले काम थांबवून वाहनांना जाण्यासाठी मोकळी वाट करून देण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एकाच वेळी अनेक अवजड वाहने आल्याने व त्यातच चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने बुधवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक ठप्प झाली. वाहतूक नियंत्रक विभागाचे पोलीस नसल्याने संपूर्ण घाट वाहनांनी व्यापून गेला. मागील वर्षीच्या पावसाने खचलेल्या परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणांतर्गत संरक्षक भिंत उभारण्याचे काम प्रथम प्राधान्याने सुरू आहे. आता पर्यंत साधारण दीडशे मीटरहून अधिक संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. पण संरक्षक भिंती सोबतच डोंगराच्या बाजूची खोदाई आणि रुंदीकरणाचे काम देखील सुरू असल्याने त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्या लगतच मोठमोठाले खडक व भरावाची माती ओतण्यात आली आहे.

या घाटातून एकेरी वाहतूक करणे शक्य आहे. तरी देखील दोन्ही बाजूने अवजड वाहने सोडले जात असल्याने अनेकदा या घाटात वाहतूक कोंडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशातच बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते ठीक साडे सात वाजेपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामध्ये अवजड वाहने, एसटी बस तसेच इतर कंपन्यांच्या बस देखील अडकून पडल्या होत्या. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही काळ गेल्यानंतर सर्व वाहने पुन्हा मार्गस्त झाली.

RELATED ARTICLES

Most Popular