26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeChiplunतांत्रिक कारणास्तव परशुराम घाट महामार्गावरील वाहतूक बंदच्या वेळेमध्ये अंशत: बदल

तांत्रिक कारणास्तव परशुराम घाट महामार्गावरील वाहतूक बंदच्या वेळेमध्ये अंशत: बदल

३ मे २०२२ ते दिनांक २५ मे २०२२ या कालावधीत दुपारी १२.०० ते सायंकाळी ०६.०० या दरम्यान परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पुर्णत: बंद करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे ठराविक काळासाठी वाहतूक थांबवून दुरुस्तीचे काम वेगाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महामार्ग सकाळी ११ ते ५ या वेळेमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. वेळेमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांजकर्डील आदेशाने पनवेल-महाड पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील कि.मी २०४/२०० ते २०७/१०० या परशुराम घाट मधील लांबीमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्याच्या दृष्टीने २५ एप्रिल २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीमध्ये सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० या दरम्यान परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक या आधीच्या  २२ एप्रिल २०२२ च्या आदेशाने पुर्णत: बंद करण्यात आली आहे.

तथापि, वाहतुक बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतुक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांजकडील दिनांक ०२ मे २०२२ रोजीचे निर्देशानुसार तांत्रिक कारणास्तव याआधीच्या २२ एप्रिल २०२२ च्या आदेशामध्ये अंशतः बदल करण्यात आला असून ०३ मे २०२२ ते दिनांक २५ मे २०२२ या कालावधीत दुपारी १२.०० ते सायंकाळी ०६.०० या दरम्यान परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पुर्णत: बंद करण्यात येत आहे.

याआधीच्या २२ एप्रिल २०२२ आदेशांमधील मधील जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेशातील अटी व शर्ती कायम राहतील. सदरचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांचे निर्देशाने निर्गमित करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular