27.8 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraशिर्डीच्या साईबाबा मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली

शासनाच्या आदेशानुसार पोलिसांद्वारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत साईबाबा संस्थानला लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात भोंग्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच बुधवारी रात्रीची शेजारती व पहाटेची काकड आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली. या पुढेदेखील साईबाबा मंदिराची पहाटेची काकड आरती आणि रात्री १० वाजेनंतर होणारी शेजारती आता लाऊडस्पीकरशिवाय पार पडणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पोलिसांद्वारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत साईबाबा संस्थानला लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, या निर्णयामुळे मात्र भाविकांमध्ये नाराजगी पसरली आहे.

दुसरीकडे, राज यांच्या इशाऱ्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींनी बैठक घेत भोंग्याच्या वापराबाबत चर्चा केली. बैठकीत पहाटेची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय मौलवींनी घेतला आहे. नागपाडा, मालाड, मालवणीसह मदनपुरा आणि आग्रीपाडा भागातील मशिदींचे मौलवी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. पोलिस अधिकारी देखील या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. चर्चेनंतर मौलवींनी भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आज या मशिदींची पहाटेची अजान ही भोंग्याविना पार पडली. राज्यात भोंग्यांवरून वाद निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

मुस्लिम समाजाने एकतेचे प्रतिक दाखवत आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेल्या साईबाबा समाधी मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू नका, अशी मागणी केली. शिर्डीतील सर्व मशिदीत नमाज झाली,  परंतु अजानसाठी भोंग्याचा वापर केला नाही. साईबाबा समाधी मंदिरावरील आरतीचे लाऊडस्पीकर बंद न करता पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावेत अशी मागणी शिर्डी येथील जामा मशीद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहरातील मशिदींवर पहाटेची अजाण भोंग्यावर होणार नाही,  असे मशिदींच्या विश्वस्तांनी जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जमातुल मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शकिल मुर्तझा यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे. त्यानुसार पहाटेनंतरच्या अजानसुद्धा निर्धारीत कमी आवाजामध्येच  होतील, असे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular