रत्नागिरी जिल्हाच्या सीमा, अनेक गावे अनेक कानाकोपऱ्यात वसलेली आहेत. काही ठिकाणी जायचे यायचे म्हटले तरी त्यासाठी पक्का रस्ता सुद्धा उपलब्ध नाही. डोंगरदर्यातून असणारी अवघड पायवाट पार करून मग इच्छित स्थळी पोहोचावे लागते.
लांजा तालुक्यातील पालू चिंचुर्टी हुंबरवणेवाडी मध्ये जाण्यासाठी अतिशय दुर्गम, डोंगरी भागातून दिव्य पार करत जावे लागते. या डोंगरात वसलेल्या वाडीची लोकसंख्या ३५० इतकी आहे. डोंगराच्या उंच भागावर वसलेल्या वाडीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध नाही. ग्रामस्थांना अत्यंत बिकट, डोंगरातून दोन तास तरी पायपीट करत घरी जावे लागते. आजारी, वृद्धाची डोलीने ने-आण करावी लागत आहे. यामध्ये उपचारांसाठी उशीर झाल्याने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.
खासदार विनायक राऊत यांनी पालू चिंचुर्टी हुंबरवणेवाडीला भेट देवून रस्ता, पाण्याची समस्या खासदार विनायक राऊत यांनी जाणून घेतली होती. त्यांनी सोशल मिडीयावर रूग्णांना डोलीतून नेताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची दखल घेऊन त्या गावाला भेट दिली. त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या सेवेला कायमच खास. राउत प्रथम प्राधान्य देतात.
बुधवारी श्री. राऊत यांनी मंत्रालयात ना. मुश्रीफ यांच भेट घेवून अतिदुर्गत, डोंगरी भागात वसलेल्या वाडीतील ग्रामस्थांच्या दुरावस्थेची छायाचित्रे सादर केली. या रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. त्यावर ना. हसन मुश्रीम यांनी खास. विनायक राऊत यांना या भागातील रस्त्यांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा विशेष निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.