26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriॐ राम कृष्ण हरि नामस्मरणात, २० किमीची पावस पदयात्रा संपन्न

ॐ राम कृष्ण हरि नामस्मरणात, २० किमीची पावस पदयात्रा संपन्न

पहाटे साडेचार वाजता जयस्तंभ येथून अपूर्व उत्साहात पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेचे यंदाचे विसावे वर्ष असून उदंड प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरी शहरातून दरवर्षी . प. पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सवाचे औचित्य साधून पदयात्रा निघते. अनेक स्वामी भक्त यामध्ये हिरीरीने सहभागी होतात. वाटेत येणाऱ्या अनेक अडचणींचा एकत्रितपणे सामना करताना दिसतात. आणि पहाटेला नामस्मरणात मंत्रमुग्ध झालेली हि दिंडी कधी पावसला पोहोचते हे लक्षात देखील येत नाही. एवढे सर्व नामजप, आरती आणि भजनामध्ये तल्लीन होऊन पूर्णपणे शिस्तीत पायी प्रवास करत पोहोचतात. आणि हा अनुभव नक्कीच अवर्णनीय असल्याची माहिती पदयात्रेत सहभागी असणाऱ्यांनी दिली आहे.

ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करीत पदयात्रेत स्वामीभक्त पहाटेच्या धुंद वातावरणात चालत निघाले. प. पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सवानिमित्त रविवारी दि. १८ सुमारे २० किमीची पदयात्रा काढण्यात आली. पहाटे साडेचार वाजता जयस्तंभ येथून अपूर्व उत्साहात पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेचे यंदाचे विसावे वर्ष असून उदंड प्रतिसाद मिळाला.

दिंडी म्हणजे केवळ चालण्याची स्पर्धा नव्हती. पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्‍वास किती खोलवर घेता येतो हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी आल्याचे आयोजक आणि सहभागींनी सांगितले. सकाळचे धुके, भाट्ये समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे कुंद वातावरण, समधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी पाहून सारेजण आनंदित झाले.

मजल दरमजल करीत सकाळी नऊ वाजता दिंडी पावस येथे पोहोचली. स्वामी मंदिरासमोर दिंडी आल्यावर भाविकांचा उत्साह शिगेला पोचला. भाविकांनी मंदिराबाहेरील चौकात रिंगण घातले. महिलांनी फेर धरून, फुगड्या घालून आनंद लुटला, अभंग सांगितले.  दिंडीत पुरुषांनी पांढरी टोपी घातली होती. वाटेत पाणी, चहाची व्यवस्था करण्यात आली होती. वारीचे यशस्वी आयोजन योग शिक्षक, उद्योजक, स्वामीभक्त अनंत आगाशे, राजन पटवर्धन आणि सर्व सहकाऱ्यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular