29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...
HomeRatnagiriबागायतदार आणि शेतकऱ्यांचे शासनाला साकडे

बागायतदार आणि शेतकऱ्यांचे शासनाला साकडे

पावस परिसर रत्नागिरी आंबा बागायतदार सहकारी संस्थांतर्फे पावस उर्दू हायस्कूलमध्ये आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांची बैठक झाली असता त्यामध्ये तौक्ते वादळासारख्या आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सर्वानाच सहन करावे लागले. शासनाकडून पंचनामा करून सढळ हस्ते मदतही पुरविण्यात आली. परंतु, या चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले उत्पन्न मिळणारी अनेक आंबा, काजू, नारळ, पोफळीची झाडे जमीनदोस्त झाली. झाडावर एकही फळ उरले नव्हते, काही झाडे तर मुळासकट उन्मळून पडली होती. त्यामुळे शेतकर्यांनी इतकी वर्ष पोटच्या पोरासारखी सांभाळ केलेली झाडे एका क्षणांत नष्ट झाली.

अनेक शेतकरी शेती, कोणतेही फळ उत्पादन किंवा कोणतेही हंगामी उत्पादन घेण्यासाठी कर्ज घेतात , काहीतर अगदी विमा सुद्धा उतरवून घेतात. विमा काढला म्हणजे झालेल्या नुकसानीची भरपाई सहज मिळाली असे होत नाही. विमा कंपन्यांच्या सुद्धा अनेक अटी शर्थी केलेल्या असतात, त्यामुळे ही प्रक्रिया नक्कीच खूप कंटाळवाणी असते, त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार सुद्धा या गोष्टीकडे पाठ फिरवतात.

पावस मध्ये झालेल्या या बैठकीमध्ये बागायतदार आणि शेतकरी यांच्या समस्यांबद्दल शासनाकडे विविध मागण्या करण्याचे योजिले आहे.

  • यापुढील घेतली जाणारी कृषी कर्जावर फक्त पाच टक्के व्याजदराने आकारणी करावी.
  • त्यामध्ये बागायतदारांवरील सर्व कर्ज माफ करावे किंवा त्यामध्ये सवलत देण्यात यावी.
  • शेतीची मीटर वेगळी मिळत असल्याने बिलावर शेती बील असा उल्लेख करावा, शेतीच्या माफक दराने वीज बिल आकारणी करण्यात यावी. उगीचच अवाच्या सव्वा वीजबिल वाढवून पाठवू नये.
  • शेतीसाठी लागणारी बियाणी, खत आणि किटकनाशके , अवजारे यांवरील जीएसटी माफ करावी.
  • विमा कंपन्यांपासून त्वरित विमा कवच रक्कम अदा करण्यात यावी.

 बागायतदार आणि शेतकरी कायमच अनेक संकटाना तोंड देत उदरनिर्वाह करत असतात. अशा अनेक समस्या आहेत, ज्यावर अजून सरकारने काहीही ठोस पाउल उचललेले नाही, आणि आमदार आणि खासदारांनी सुद्धा दुर्लक्ष केले आहे. पणजर परिस्थिती अशीच राहिली तर येणार्या निवडणुकीमध्ये त्याबाबत प्रत्युत्तर देण्यात येईल असे सज्जड इशारा सुद्धा बैठकीमधील सदस्यांनी दिला आहे. त्यामुळे वरील सर्व मागण्या शासनाकडे करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये बावाशेठ साळवी, अक्रमशेठ नाखवा,काझी , आंग्रे इत्यादी जेष्ठ आंबा व्यावसायिक हजार होते.

RELATED ARTICLES

Most Popular