25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunरिक्षा पासिंगचा दंड अखेर रद्द - आमदार शेखर निकम

रिक्षा पासिंगचा दंड अखेर रद्द – आमदार शेखर निकम

रिक्षा पसिंगची मुदत संपल्यानंतर रोजचा दंड आकारला जात होता.

येथील रिक्षा व्यावसायिकांना यापूर्वी खंबीर पाठबळ मिळाले नाही. आमदार शेखर निकम यांनी रिक्षा व्यावसायिकांना खंबीरपणे साथ देतानाच त्यांच्या समस्या मागों लागण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे रिक्षा पासिंगचा प्रश्न मागों लागला आहे. रिक्षाच्या किमतीपेक्षा दंडाची रक्कम वाढत होती. आमदार निकम यांनी हा प्रश्न तारांकित केल्याने ही रद्द करण्यात आली असून आता विनादंड रिक्षा पासिंग होणार आहे. शासनस्तरावर पाठपुरावा केल्याने आमचे प्रश्न मार्गी लागत असल्याची भावना व्यक्त करत रिक्षा संघटनेच्या पदाधिका-यांनी आमदार शेखर निकम यांचा सत्कार केला.

रिक्षाचालक मालक व्यावसायिकांच्या अनेक मागण्या अनेक वर्षे खितपत पडल्या आहेत. या संदर्भात त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आमदार शेखर निकम यांनी मध्यस्थी करून हा बहिष्कार मागे घेण्यास लावला होता, या प्रश्नासंदर्भात स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदारांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून रिक्षा व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानुसारच पहिली मागणी शासनाने मान्य करून रिक्षा व्यावसायिकांना सुखद धक्का दिला.

रिक्षा पसिंगची मुदत संपल्यानंतर रोजचा दंड आकारला जात होता. रिक्षाव्या किमतीपेक्षा दंडाची रक्कम वाढत जात होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला जात होता: मात्र निकम यांनी ही अट रद्द केल्याने आणि विनादंड रिक्षा पासिंग होणार असल्याने रिक्षा व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला. रिक्षा संघटनेचे नेते दिलीप खेतले, संजय जोशी, रामदास भोजने, प्रशांत गोरिवले, विठ्ठल दाते, अविनाश कदम, राजू गुडेकर, अप्पा सकपाळ, रवींद्र घाडगे, नरेश पालकर, प्रशांत कदम आदी पदाधिकारी यांनी आमदार निकम यांची भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular