21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीतील मनोरुग्णालय पळवण्याचे कारस्थान हाणून पाडू; शौकत मुकादम

रत्नागिरीतील मनोरुग्णालय पळवण्याचे कारस्थान हाणून पाडू; शौकत मुकादम

'रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेले मनोरुग्णालय कोल्हापूर निपाणी येथे स्थलांतरित करण्याचा डाव सुरू आहे. पण याद राखा, रत्नागिरीतील मनोरुग्णालय पळवण्याचे हे कारस्थान पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडू, वेळ पडल्यास जनआंदोलन उभे करू असा थेट इशारा राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राला आवश्यकता असेल तर त्यांनी जरूर नवीन रुग्णालय मंजूर करून घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे. ‘रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील तशी तयारी दाखवली असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती देखील पुढे येत आहे. 

प्रत्यक्षात मनोरुग्णालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन लवकरच प्रस्तावित आहे. मग असे असताना थेट मनोरुग्णालय स्थलांतरित करण्याचे कारस्थान कोणाचे असा प्रश्न शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे. शौकत मुकादम म्हणाले यापूर्वीच जिल्ह्यातील काही कार्यालये इतर ठिकाणी हलवण्यात आली आहेत. आता चक्क अत्यंत महत्वाचे असे मनोरुग्णालय थेट जिल्हाबाहेर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या टोकावर घेऊन जाण्याचा डाव आहे. मग कोकणातील लोकांनी आणि रुग्णांनी काय करावे? येथील मनोरुग्ण पश्चिम महाराष्ट्रात जातील का ? त्यांना ते परवडेल का? म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असा हा प्रकार होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण जास्त आहेत हे मान्य पण त्यासाठी रुग्णालय स्थलांतरितं करणे हा कोकणावर एक प्रकारे अन्याय आहे, असेही मुकादम

यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांना पत्र लिहून वस्तुस्थिती निदर्शनास आणून देतानाच येथील मनोरुग्णालय स्थलांतरित करू नये अशीं मागणी आपण केली आहे. तरी देखील मनोरुग्णालय स्थलांतरित करण्याचे कारस्थान केले गेले तर मात्र गप्प बसणार नाही. सर्व कारस्थान पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडू, वेळ पडल्यास जिल्हाभरात जन आंदोलन उभारू असा थेट इशारा देखील मुकादम यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राला जर गरज असेल तर त्यांनी नवीन मनोरुग्णालय मंजूर करून घ्यावे असेही त्यांनी नमूद केले आहे.

अनेकांचा मोठा विरोध – शौकत मुकादम यांच्या बरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी, वंचीतचे सुभाष जाधव यांनी देखील जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन रत्नागिरीचे मनोरुग्णालय स्थलांतरित करण्यास टोकाचा विरोध दर्शवला आहे. तसेच काही सामाजिक संस्थांनी देखील जोरदार विरोध केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular