बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. पोलीस व्हॅनमधून त्याला तळोजा येथून बदलापूर येथे तपासा कामी नेण्यात येत होते. त्याच दरम्यान अक्षय शिंदेने पोलीस व्हॅनमध्येच गोंधळ घालून पोलीस अधिकाऱ्यांकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेत पोलीसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर म्हणून सीनियर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी, त्यांच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीमुळे अक्षय शिंदे यमसदनी गेला आणि बदलापूर प्रकरणाचा बदला पूर्ण झाल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्य जनतेमध्ये व्यक्त होत आहे. तशी चर्चा देखील सुरूं आहे. या एन्काऊंटरमध्ये निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी देखील झाले.
या प्रकरणांमध्ये ज्यांच्या पायाला गोळी लागली ते निलेश मोरे आणि ज्यांच्या गोळीमुळे आरोपी अक्षय शिंदें मेला ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याचे सुपुत्र आहेत. खेडच्या सुपुत्रांनी बदलापूरचा बदला पूर्ण केला अशा प्रतिक्रीया सोशल मिडियावर व्हायरल होत असून खेडच्या २ कर्तबगार सुपुत्रांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चर्चाही सुरू आहे. पोलीस व्हॅनमध्ये जेव्हा अक्षयने गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्यासोबत ऑन ड्युटी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकः निलेश मोरे यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांच्याकडील बंदूक हिसकावून घेत त्यांच्यावरच दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला लागली.
हा गोंधळ चालू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी स्वसंरक्षणार्थ समोरून होणाऱ्या फायरिंगला प्रतिउत्तर दिले. त्यांच्या गोळीने बदलापुरप्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदे मृत्यू पावला. या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदे याला ज्या दोन पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला, आरोपीला प्रत्युत्तर दिले ते दोघेही पोलीस अधिकारी खेडमधील आहेत. अक्षय शिंदेच्या गोळीने गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे खेड तालुक्यातील अस्तान या गावातील असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे ते खेड तालुक्यातील खोपी या गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे अभिनंदन केले जात आहे.