चिपळुणात कॉलेजसमोरच महाम ार्गावर कॉलेजकुमारांच्या गुंडगिरीचे वृत्त प्रसिध्द होताच सोमवारी संपूर्ण जिल्हा हादरला. दरम्यान तारूण्यात पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या ‘दादा’, ‘भाई’ची हवा पोलिसांनी काढली. कॉलेजनेही कठोर कारवाईचे आश्वासन दिले. आक्रमक झालेल्या युवासेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी या मुलांच्या भवितव्याचा विचार करून कारवाईवर समाधान मानले आणि पालकांनीही समंजस भूमिका घेत या वादावर पडदा टाकला. मात्र असे असले तरी दादा, भाईंना मात्र चांगलीच अद्दल घडल्याची चर्चा सुरू आहे. चिपळुणातील प्रसिध्द डीबीजै कॉलेजसमोर भररस्त्यात दोन मुलांना सात होती. होताच आठ मुलांनी मारहाण केली सोमवारी हे वृत्त प्रसिद्ध एकच खळबळ उडाली. गुंडागर्दी करणाऱ्यांची आणि दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांची भाईगिरी पोलीस आणि कॉलेजने चांगलीच उतरवली. डोक्यात गेलेले भाईगिरीचे भूत साफ उतरवले.
युवा सेना आक्रमक – हा प्रकार उघडकीस येताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांच्यासह शहरप्रमुख भैय्या कदम, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, प्रतीक शिंदे, राहुल भोसले, आकाश कदम, अथर्व चव्हाण, युवा सेना विभागप्रमुख अरमान खान, अली सरगुरु, श्लोक साडविलकर आदींनी आक्रमक भूमिका घेतली होती. गेले दोन दिवस कॉलेज, पोलीस आणि पालक यांच्यासोबत राहताना अशा नीच प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी हे सारे पदाधिकारी आक्रमक झाले होते.
उठाबशा त्या याच काय ? – कॉलेजमध्ये शिकणारी मुले असल्याने त्यांच्या भवितव्याचा विचारकरून साऱ्यांनीच सामंजस्याची भूमि का घेतली. मात्र तरीही अद्दल घडली पाहिजे, चूक लक्षात आलीच पाहिजे, या हेतूने मारहाण करणाऱ्या मुलांना २०० उठाबशा आणि मार खाणाऱ्यांना १०० उठाबशा काढायला लावण्यात आल्या. पोलीसांनीही कडक कारवाई केली.
सज्जड दम – पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी साऱ्या भाई, दादा, कॉलेजकुमारांना सोमवारी आपल्या दालनात बोलावून घेतले. त्यांच्याकडून जाबजबाब लिहून घेतला. साऱ्यांना पुन्हा जर दादागिरी केलीत तर मग बघाच, असा मजबूत दमच त्यांनी दिला. पोलिसांचा दम मिळताच दादा, भाईची हवाच निघून गेली.
उमेश खतातेंचे कौतुक – खरे तर या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र गेले २ दिवस या विषयात सक्रिय असलेले युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी कधी आक्रमक तर कधी संयमी भूमिका घेत कुठेही जातीचा, धर्माचा संबंध येवू न देता यशस्वी मध्यस्थी केल्याने साऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. तर कॉलेजनेही कारवाईचे आश्वासन दिल्याने शात भूमिका घेत दन्हिों बाजूंच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून युवासेनेने योग्य भूमिका घेत या प्रकरणाला वेगळे वळण मि ळणार नाही, याची दक्षता घेतली.
दादा, भाईंची मस्ती उतरली – मोठ्या स्टाईलने कॉलेज विद्यार्थ्यांसमोर दादा, भाई झालेल्या या विद्यार्थांची भाईगिरी पोलिसानी उतरवलीच, बरोबर भाईगिरी केल्यावर काय काय घडते हेदेखील त्यांना पहायला मिळाले. डोक्यात शिरलेले भाईगिरीचे भूत चांगलेच उतरविण्यात आले. दादा, भाईंची मस्ती जिरवली हे बरेच झाले, अशी चर्चा आता सुरू आहे.