27 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

iPhone 16 मालिका विक्री सुरू, 5000 रुपयांची झटपट सूट…

Apple iPhone 16 मालिका अधिकृतपणे आजपासून म्हणजेच...

ऋषभ पंतने एमएस धोनीला बांगलादेशविरुद्ध केलेल्या कारवाईची आठवण करून दिली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना...
HomeChiplunचिपळुणातील व्यापाऱ्यांचा निर्णय ऑनलाइन शॉपिंग विरोधात ठरवणार धोरण

चिपळुणातील व्यापाऱ्यांचा निर्णय ऑनलाइन शॉपिंग विरोधात ठरवणार धोरण

व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर अनेक समस्या भेडसावत आहेत.

ऑनलाइन शॉपिंगमुळे चिपळूण बाजारपेठेचे ४० टक्के नुकसान झाले आहे. ऑनलाइन शॉपिंगचा बाजार यापुढेही असाच चालू राहिला तर पुढील दहा वर्षांनंतर किरकोळ व्यापारी राहतील की नाही याबाबत शंका आहे. गणेशोत्सवानंतर व्यापाऱ्यांचा चिपळूण शहरात मेळावा होणार आहे. त्यात ऑनलाइन शॉपिंग विरोधातील धोरण ठरवले जाणार आहे, अशी माहिती व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष शिरीष काटकर यांनी दिली. चिपळूणच्या व्यापारी संघटनेत फूट पडल्यानंतर संघटनेचे माजी अध्यक्ष काटकर यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवानंतर व्यापाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंगच्या विरोधातील धोरण ठरवले जाणार आहे.

याबाबत माहिती देताना काटकर म्हणाले, ‘यावर्षी बाजारपेठेत गर्दी होती; परंतु बहुतांशी नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीचा व्यापाऱ्यांना म्हणावा तेवढा फायदा झाला नाही. ऑनलाइन व्यापार करणाऱ्या कंपन्यांमध्ये पूर्वी सरकारचा ५१ टक्के आणि या कंपन्यांचा ४९ टक्के हिस्सा होता. आता ऑनलाइन शॉपिंगमध्ये सरकारची भागीदारी पूर्णपणे संपली आहे. ब्रँडेड कंपन्या किरकोळ व्यापारांना चांगला नफा देण्यास तयार नाही. जीएसटी, इन्कम टॅक्स, कामगारांचा पगार, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर आणि इतर किरकोळ खर्च स्थानिक व्यापारांना भागवावे लागते. ऑनलाइन शॉपिंग करताना कंपनी देईल ती वस्तू ग्राहकांना स्वीकारावी लागते.

स्थानिक बाजारपेठेत खरेदी करताना मात्र ग्राहक आवडीनुसार वस्तू निवडतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाइन शॉपिंगच्या विरोधात केंद्रात आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही चिपळूणमधील व्यापारी स्थानिक पातळीवर आवाज उठवणार आहोत. चिपळूणमधील स्थानिक व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर अनेक समस्या भेडसावत आहेत. यातील काही समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. व्यापाऱ्यांना कोणताही जातधर्म नसतो. व्यापारी ही एकच जात आहे, असे समजून जे लोक काम करतात अशी समविचारी लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यासाठी सरकारकडे लढण्याचा मानस आहे. त्यासाठी गणपतीनंतर व्यापारांचा मेळावा घेण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular