21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriचित्रकला स्पर्धेवेळी ढिसाळ नियोजनाने कळा, महासांस्कृतिक महोत्सवात पालक संतप्त

चित्रकला स्पर्धेवेळी ढिसाळ नियोजनाने कळा, महासांस्कृतिक महोत्सवात पालक संतप्त

शाळांचे विद्यार्थी हे मैदानावरील मातीत बसून भर उन्हात चित्र काढत होते.

रत्नागिरीमध्ये सध्या महासंस्कृती महोत्सव सुरू आहे. या निमित्ताने शालेय मुलांची छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे झालेली ही स्पर्धा ढिसाळ नियोजनाने गाजली. आयोजक वेळेत आले नव्हते. महोत्सवावर लाखो रुपये खर्च करणारे प्रशासन चित्रकला स्पर्धेसाठी साधे मुलांना कागदही देऊ शकले नाही. विद्यार्थ्यांना मैदानावरील लाल मातीत बसण्याची वेळ आल्याने पालकांनीही तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरही ढिसाळ नियोजनाचे वाभाडे काढले. महासंस्कृती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पालिका हद्दीतील शाळांमधील मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली.

तीन दिवसांपूर्वी तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने, पालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांमधून नोटीस फिरवली. शाळांनीही प्रशासनाच्या हुकुमावरून विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर स्पर्धेची माहिती देत स्पर्धेत सहभाग घेण्याचे बंधनकारक केले होते. दोन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यामुळे तीन-साडेतीन हजार विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाव एकत्र आले होते. यातील अनेक विद्यार्थी पॅव्हेलियनमध्ये बसून स्पर्धेत सहभागी झाले होते.

तर अनेक शाळांचे विद्यार्थी हे मैदानावरील मातीत बसून चित्र काढत होते. भर उन्हात विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. स्पर्धेतील नियोजनाचेही तीनतेरा वाजले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालक संतापले होते. स्पर्धा उरकण्यावर शिक्षक व अधिकाऱ्यांचा भर होता, असा आरोप त्यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular