27.8 C
Ratnagiri
Tuesday, July 23, 2024

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्टच आपला दावा खरा ठरलाः वैभव खेडेकर

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट होत...

रिक्त जागी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करा – संघटनेची मागणी

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक...

गणपती स्पेशल रेल्वे अवघ्या ८ मिनिटात फुल्ल झाल्याने संताप

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरम...
HomeChiplunतटकरेंसमोर ठाकरेंनी उभे केले मोठे आव्हान

तटकरेंसमोर ठाकरेंनी उभे केले मोठे आव्हान

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद मेळाव्यातून अजित पवार गटातील एकमेव रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना मोठे आव्हान उभे केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करत याच मतदारसंघात तब्बल पाच जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांना मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून जनसंवाद दौऱ्याला सुरुवात केली.

त्यात उद्धव ठाकरेंची तोफ शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपवर घडाडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत रायगडकर पुढील निवडणुकीत मोदींच्या विरोधात त्सुनामीसारखे मतदान करणार आणि आपला उमेदवार निवडून आणणार, असे जाहीर आवाहन ठाकरेंनी जनतेला केले. या वेळी ठाकरेंच्या सर्वच सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा केवळ दोन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता.

रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी तटकरेंना पराभवाची धूळ चारली होती; परंतु त्याची परतफेड तटकरेंनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून अनंत गीते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी ठाकरेंच्या जनसंवाद सभांमधून बोलून दाखवले आहे. रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील अलिबाग, महाड आणि दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर फक्त गुहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटात आहेत.

यातच पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवींद्र पाटील तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्री आदिती तटकरे आमदार आहेत. रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी कागदावर हा मतदारसंघ महायुतीसाठी भक्कम आहे; परंतु सध्या पक्षात झालेली फाटाफूट यामुळे रायगडकर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने उभे राहतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाकडून म्हणजेच महायुतीकडून तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाकडे असला तरीही येथे ठाकरेंची ताकद अधिक आहे. त्यामुळे आघाडीकडून ठाकरेंना हा मतदारसंघ दिला तर पुन्हा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना रिंगणात येऊ शकतात. तसे झाल्यास तटकरे विरुद्ध गीते असा सामना अटातीचा ठरू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular