26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...

चिपळुणात ‘मनसे’चे हिंदी सक्तीविरोधात आंदोलन

केंद्र सरकारने पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करून...
HomeRatnagiriखराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

एका बोटीला मच्छिमारीकरिता जाऊन येण्याकरिता किमान १५ हजार रुपयांचे डिझेल लागते.

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी मिळायला प्रारंभ होतो. त्यामुळे एप्रिल आणि मे हे हंगामातील अखेरचे दोन महिने कोळी मच्छिमार बांधवांकरिता आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे असतात. परंतु यंदा वातावरणात आणि विशेषतः तापमानात झालेल्या वाढीमुळे समुद्रात मासे मिळेनासे झाले आहे. एका बोटीला मच्छिमारीकरिता जाऊन येण्याकरिता किमान १५ हजार रुपयांचे डिझेल लागते. मात्र मासेमारीला गेलेल्या या बोटींना डिझेलच्या किमती इतके देखील सध्या मासे मिळत नसल्याने, अनेक मच्छिमार बोटी बंदरातच थांबून राहील्या आहेत. परिणामी मच्छिमारांमध्ये मोठ्या चिंतेचे वातावरण असल्याची माहिती येथील जाणकार मच्छिमार बांधवांनी दिली दरम्यान परप्रांतीय नौकांची कोकणच्या आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात होणारी घुसखोरी आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यात समुद्रातील बदलामुळे झालेल्या माशांच्या स्थलांतरामुळे मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. एप्रिल महिना सुरु झाल्यानंतर मुबलक मासळी मिळेल, असी मच्छीमार नौका मालकांना आशा होती, ती पूर्णपणे फोल ठरली आहे. मासळी अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने दर अजून उतरलेले नाहीत.

तापमानात वाढ होऊन कोकणातील मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा अंदाज गेल्या महिन्यातच जाणकार मच्छिमारांनी वर्तविला होता, वातावरण बदलामुळे माशांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोकणच्या सागरी किनारपट्टीत पारंपरिक पणे मिळमारे मासे गेल्या काही दिवसांपासून कमी होवू लागले होते, त्यावरुनच तापमानात बाढ होणार असा अंदाज स्थानिक मच्छिम ारांनी सांगला होता आणि तो गेल्या ५ एप्रिल पासून खरा उतरत असल्याचे दिसून येत आहे. तापमान गादीचे परिणाम मानवाप्रमाणे माशांवर देखील होत असतात. तापमानात वाढ झाल्यामुळे माशांच्या चयापचय क्रियांचा दर वाढतो. त्यामुळे त्यांचा श्वसन दर आणि अखेरच्या टप्प्यात माशांमध्ये घट होण्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा त्यामध्ये हंगामाच्या अखेरच्या टप्यात मोठी घर होण्याची शक्यता मच्छिमार सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान १ जून रोजी सागरी मासेमारी बंद होणार असल्याने केवळ दिड महिनाच हातात असल्याने मच्छिमार बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. वाढलेल्या तापमान क्षेत्राकडून सांगरी माशांचे कमी तापमान क्षेत्राकडे स्थलांतर होते आणि किनारी भागातील मासे दुर जातात आणि मासे मिळण्याचे प्रमाण कमीहोते. मासेमारीवर परिणाम अन्य घटकात कारखान्यातील रासायनिक पाणी, कचरा, सांडपाणी हे सर्व समुद्रात सोडल्याने माश्यांवर त्याचा प्रभाव दिसून आला आहे, वाढती जल पातळीचाही परिणाम देखील मासेमारी आणि मत्स्योत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular