28.8 C
Ratnagiri
Thursday, January 22, 2026

राजापुरात महायुतीमध्ये बंडखोरांची उसळी उबाठासह काँग्रेसही स्वतंत्रपणे आखाड्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी बुधवारी...

जगबुडी नदीत सापडली तब्बल २ टन मासळी

प्रदूषणाने चर्चेत अधूनमधून असलेल्या दाभोळखाडीतून खेडकडे वाहणाऱ्या...

गुरुदेव श्री श्री रविशंकर आज रत्नागिरीत गोगटेच्या मैदानावर भक्तीचा महासत्संग

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या रत्नागिरी नगरीत लवकरच...
HomeKokanशेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक असणाऱ्या संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. उन्हाळी सुट्टीला गावी आलेल्या भाच्यासह संतोष पाटील यांची दोन्ही मुलं श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. तेव्हा खोल पाण्यात लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले आणि बुडाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा ऐरोली इथून गावी आला होता. त्याच्यासोबत संतोष पाटील यांची दोन्ही मुलं वेळास बीचवर गेले. बीचवर तिघेही पोहायला समुद्रात उतरले असताना मोठ्या लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले. तिन्ही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानं संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतोष पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी नवी गाडीही घेतली होती. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं. पण आता तीन मुलांच्या अशा मृत्यूने पाटील कुटुंब दुःखाच्या सागरात बुडालंय. पाटील यांचे म्हसळा तालुक्यातल्या गोंडघर इथं घर संतोष पाटील यांची मयुरेश आणि अवधुत ही दोन मुलं भाचा हिमांशूसोबत वेळास बीचला गेले होते. हिमांशू मुंबईत राहत असून सुट्टीनिमित्त तो गावी आला होता. तिघांचेही वय २१ ते २६ वर्षे इतकं आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

RELATED ARTICLES

Most Popular