जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार आजपासून संपावर आहेत. मुदत बाह्य इ-पॉस मशीन तत्काळ शासनाने बदलून द्यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी त्यांनी राज्य फेडरेशनला पाठिंबा दिला आहे. त्या अनुषंगाने मुदतबाह्य पॉस मशिन आज जमा करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने ही वस्तुस्थिती शासना पर्यंत पोहचवून रेशन दुकान चालविण्याबाबत धोरण ठरवून द्यावे, अशी मागणी जिल्हा रास्त धान्य दुकान चालक-मालक संघटनेने केली आहे. रास्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी राज्य फेडरेशनने संप जाहीर केला आहे. यामध्ये बहुतेक दुकान चालक-मालकांच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे फेडरेशनला आम्ही पाठिंचा जाहीर केला आहे.
परंतु जिल्हातील महत्त्वाची समस्या इ-पॉस मशिनची आहे. बहुतेक मशिन मुदतबाद्धा झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईचे धान्य वाटपाचे काम अनेक ठिकाणी बंद आहे. मुदतबाह्य झालेल्या मशिन आज जिल्हा पुरवठा विभागाला जमा करण्यात आल्या आहेत. शासनाने त्या तत्काळ द्याव्यात. त्याला वेळ लागणार असलेत तर त्या कालावधीत आम्ही काय करायचे ते प्रशासनाने धोरण ठरवून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. पॉस मशीन नसल्याने ग्राहकांना ऑनलाईन धान्य देणे शक्य नाही. त्याबाबत प्रशासनाने मार्गदर्शन करावे. कोरोना काळातील कमिनश देखील अद्याप मिळालेले नाही, ते मिळावे अशी संघटनेची मागणी आहे.