29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeChiplunस्थानिक पातळीवर सत्तेचा वाटा मिळत नाही - राज्यमंत्री आठवले

स्थानिक पातळीवर सत्तेचा वाटा मिळत नाही – राज्यमंत्री आठवले

काँग्रेसकडून संविधान बदलाचा अपप्रचार केला

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आपण चालवत आहोत. देशातील ३५हून अधिक राज्यांमध्ये आरपीआय सक्रिय आहे. मी सत्तेत सहभागी असलो तरी स्थानिक पातळीवर सत्तेचा वाटा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे; मात्र बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हे एकमेव ध्येय आपले आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तिसऱ्यांदा आपल्याला मंत्रिपदाची संधी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल जिल्ह्याच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रीतम रूके, गौतमभाऊ सोनावणे, सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, दादासाहेब मर्चेंडे, विठोबा पवार आदी उपस्थित होते. वेळ आली तर देईन माझी जान, कोणालाही बदलू देणार नाही देशाचे संविधान, या शायरीने आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, आरपीआयमार्फत मी एकमेव राज्यसभेचा खासदार आहे.

माझ्या पक्षाला सभागृहात बोलायला कमी वेळ मिळतो म्हणून मी शायरीच्या माध्यमातून कमी शब्दात माझ्या भावना सभागृहात मांडत असतो. काहींना ते पटत नाही; परंतु मला पटते ते मी करतो. आरपीआयच्या माध्यमातून दिल्ली दरबारी बाबासाहेबांचे विचार मांडण्याचे काम आपण करत असतो व मरेपर्यंत मी आरपीआयचे नाव पुसू देणार नाही. काँग्रेसकडून संविधान बदलाचा अपप्रचार केला गेला; परंतु बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान कोणीही बदलणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

देशासह राज्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग पूर्ण झाले; परंतु मुंबईपासून गोव्याला जोडणारा महामार्ग अद्याप अपूर्ण आहे. याची कारणे काय आहेत या खोलात मी जाणार नाही; परंतु हा महामार्ग पूर्ण होणे पर्यटनवाढीसाठी आवश्यक आहे. याबाबत आपण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कमीत कमी वेळेत हा मार्ग पूर्ण करण्याची मागणी करणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मागास समाजाचे प्रश्न सोडवले जात आहेत. त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या स्मारकासाठी भरीव निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular