पुणे येथे राहणाऱ्या अवघ्या सोळा वर्षाच्या प्रथमेश जाजू ने चंद्राचा अद्भुत सुंदर व सुस्पष्ट फोटो काढला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडिया मध्ये खूप व्हायरल झाला आहे.
प्रथमेश ने दिनांक 3 मे रोजी पहाटे दीड ते साडेपाच वाजेपर्यंत राहत्या घराच्या गच्चीवरून स्वतःच्या टेलिस्कोप कॅमेरातून चंद्राचा सर्वात स्पष्ट फोटो काढला आहे. आपण कोणताही फोटो काढल्यानंतर झूम केल्यावर तो फोटो ब्लर किंवा धूसर होतो हे टाळण्यासाठी, प्रथमेशने चंद्राच्या वेगवेगळ्या भागांचे छोटे छोटे व्हिडिओ काढले. प्रथमेश ने खूप झूम करून म्हणजेच चंद्रावरील खड्डा दिसेल असे 38 व्हिडिओ काय काढले व प्रत्येक व्हिडीओमधून सुमारे दोन हजार इमेज काढल्या. या सर्व इमेजेस जोडून प्रथमेश ने एक अंतिमरित्या तपशीलवार म्हणजेच डिटेल फोटो तयार केला.
हा फोटो कितीही झूम केला तरी तो तेवढाच सुस्पष्ट दिसेल असा केला. प्रथमेश ला या सर्व प्रक्रियेसाठी सुमारे 38 ते 40 तास काम करावे लागले. प्रथमेश ने सध्या दहावीची परीक्षा दिली आहे तसेच तो ज्योतिरादित्य या ॲस्ट्रॉनॉमी संस्थेमध्ये स्वयंसेवक आहे. ही संस्था भारतातील जुनी ॲस्ट्रॉनॉमीची संस्था आहे तिथे ॲस्ट्रॉनॉमी चे विविध कोर्सेस, प्रदर्शने व माहिती दिली जाते. प्रथमेश ने या संस्थे मधूनच ॲस्ट्रॉनॉमी चे बेसिक ज्ञान घेतले आहे
प्रथमेश ने काढलेला फोटो सध्या सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल झाला असून खूप लोकांनी आपल्या घरी प्रिंट काढून फ्रेम करण्यासाठी मागणी केली आहे. तसेच चंद्राच्या संदर्भीत विषयावर पीएचडी करणाऱ्या एका मुलाने सुद्धा त्या फोटोचा अभ्यासासाठी वापर केला आहे. सध्या प्रथमेश एक आवड व छंद म्हणून एस्ट्रो फोटोग्राफर करतोय सेच चंद्र सूर्य ग्रह व तारे या सर्वांचे टेलिस्कोपने व कॅमेर्याने फोटो काढतो. भविष्यात प्रथमेशला ॲस्ट्रोनॉमी व ॲस्ट्रोफिजिक्स संदर्भातील संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.