25.1 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना…

क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा...
HomeIndiaपंतप्रधानांचा विशेष बांगलादेश दौरा

पंतप्रधानांचा विशेष बांगलादेश दौरा

बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना या स्वतः त्यांचे आपल्या देशात स्वागत करण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. याचवेळी विमानतळावरच प्रधानमंत्री मोदी यांना 'गॉड ऑफ ऑनर' देऊन त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी दिलेल्या निमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. बांग्लादेश पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून पंतप्रधान मोदी यांना बांग्लादेश सरकारकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. बांगलादेश दौऱ्यापूर्वी मोडी म्हणाले, शुक्रवारी २६-२७ मार्चला आपण बांगलादेशचा दौर्यावर जात आहोत. आपण बांगलादेशच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहोत. बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी मोदींनी अशाप्रकारचे ट्वीट केलं आहे. कोरोना व्हायरस महामारीनंतर शेजारील मित्र देशाचा केला जाणारा हा पहिलाचं दौरा असेल. यावर मोदी म्हणाले कि, भारताची भाषा, संस्कृती आणि दोन्ही देशांमधील संबंध सुद्धा दृढ आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या स्वातंत्रदिनानिमित्त होणार्‍या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमा मध्ये सहभागी होण्यासाठी २६-२७ मार्च अश दोन दिवसाच्या दौर्‍यावर गेले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या विशेष विमानाने ढाकाकडे रवाना झाले, त्यानंतर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांचे विशेष विमान ढाका येथील हजरत शहा जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना या स्वतः त्यांचे आपल्या देशात स्वागत करण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. याचवेळी विमानतळावरच प्रधानमंत्री मोदी यांना ‘गॉड ऑफ ऑनर’ देऊन त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे मोदी शेजारील देशाच्या स्वातंत्र समारोह प्रसंगी कोरोनाच्या पार्शभूमीवर 12 लाख कोरोना लसीचे डोस भेट म्हणून देणार आहेत.

modi Visit to Bangladesh

मोदींच्या दौर्याची रूपरेषा काहीशी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. ढाका येथील विमानतळावरुन मोदी यांच्या गाड्यांचा ताफा बांगलादेश येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे पोहचणार असून, तेथे पोहचल्यावर ते देशाच्या स्वातंत्र्यांसाठी शहीद झालेल्या जवानांना श्रदांजली वाहणार आहेत आणि त्यांच्या स्मृतिपित्यर्थ तिथे एक रोप लावण्यात येईल. त्यानंतर बंगबंधु-बापू संग्राहलयाचे उदघाटन दोन्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकत्रित करतील. तसेच दुसर्या दिवशी पंतप्रधान मोदी 27 मार्च रोजी सतखिरामधील श्यामनगर येथील ईश्वरपुरी गावामधील श्री जसोरेश्चरी काली मंदिराला भेट देऊन तिथे पुजाअर्चेचा नियोजित कार्यक्रम करतील. त्यानंतर बांगलादेशाच्या प्रधानमंत्री हसीना यांच्या तुंगिपारा गावी ते हेलिकॉप्टरने प्रयाण करून तेथे असलेल्या बंगबंधु मुजीबुर रहमान स्मारकाला भेट देऊन तेथेही एका रोप लावण्यात येईल.

पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या या दोन दिवसाचा दौऱ्यामध्ये विशेष मतुआ समाजच्या मंदिराचे दर्शन घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाचा 30 मतदारसंघात विशेष प्रभाव आहे. तर 27 तारखेला ते सातखिडाच्या सुरेश्वरी देवी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाण्याचे योजीले आहे. यंदा बांग्लादेश देश 50 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून हे वर्ष बंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचं जन्मशताब्दी वर्षही मानले आहे. तसेच भारत आणि बांग्लादेशच्या सुदृढ संबंधांना या वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या संकट काळानंतर आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली. शेजारधर्म म्हणजे  नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांग्लादेशला वेळोवेळी मदत केली आहे. भारताचे बांग्लादेशसोबत असलेले संबंध नक्कीच मजबूत आणि सौदार्हपूर्ण आहेत. भारताने कोरोना महामारीच्या संकटकाळातही बांग्लादेशला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे एकूण 90 लाख डोस पुरविले आहेत.

तसेच पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांग्लादेशच्या ढाका या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वे वाहतूक सेवेला मोदींच्या या दौऱ्या दरम्यान हिरवा झेंडा दाखवून आरंभ करण्यात येणार आहे.  मागील वर्षी झालेल्या व्हर्चुअल मीटिंगमध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या सह पंतप्रधान मोदी ही  सहभागी झाले होते. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा आखण्यात आलेली होती. जानेवारी 2021 मध्ये भारत भेटीला बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन आले होते व त्यानंतर बांग्लादेशच्या दौऱ्यावर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे गेले होते.

RELATED ARTICLES

Most Popular