सध्या स्मार्टवॉचचा ट्रेंड सगळीकडे सुरु आहे, स्मार्टवॉचच्या वापराचे प्रमाण लहानांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत वाढले आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांची स्मार्टवॉच बाजारात विक्रीसाठी आणली आहेत, परंतू सध्या जगात अॅपल स्मार्टवॉचची सर्वधिक मागणी असलेले स्मार्टवॉच म्हणून ओळख आहे. अॅपलला तगडी स्पर्धा देण्यासाठी सोशल मिडिया साईट फेसबुकने स्वत:चे अत्याधुनिक यंत्रणेने बनविलेले असे स्मार्टवॉच लवकरच बाजारात विक्रीस उपलब्ध होण्याची घोषणा केली आहे.
फेसबुकच्या हायटेक स्मार्टवॉच मध्ये ऑगमेंटेड रियालिटी एआर स्मार्ट ग्लास दिली गेली असल्याचे समजते. हे वॉच अँड्राईड आधारित असून त्याला गुगल ऑपरेटिंग सिस्टीम दिली गेली आहे. फेसबुक या वॉच साठी स्वतःची अशी अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा तयार करू शकते असेही म्हटले गेले आहे. विशेष करून फेसबुकने दोन वर्षापूर्वीच स्मार्टवॉचसारखी गॅजेट बनविता यावीत यासाठी सीटीआरएल लॅब्जचे अधिग्रहण केलेले.
सध्या बाजारामध्ये विविध कंपनींचे स्मार्टवॉचेस विक्रीसाठी उपलब्ध आहेत, पाहूया त्यांचा एक लेखाजोखा. अॅमेझफिट कंपनीचं स्मार्टवॉचची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असून त्याचे फीचर्सदेखील चांगले आहेत. हे स्मार्टवॉचं अनेक अॅडवान्स फीचरसह सज्ज आहे. त्यांची थोडक्यात फीचर्स पाहूया. या स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले दिलेला असून त्याद्वारे आपला फोन कनेक्ट करता येऊ शकतो. या स्मार्टवॉचमध्ये 10 स्पोर्ट्स मोड देण्यात आले असून त्याचा उपयोग आरोग्य आणि दैनंदिन कामांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आला आहे. एकूण घेतली जाणारी झोप, केल्या जाणार्या दिवसभरतील अॅक्टिव्हिटीज, हार्ट रेट यासह अनेक प्रकारची माहिती स्पोर्ट्स मोडमध्ये देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच एकदा संपूर्ण चार्ज केला की पंधरा दिवसांसाठी ते वापरले जाऊ शकते. या स्मार्टवॉचची किंमत साधारण 3999 रुपये दरम्यान आहे.
त्यानंतर दुसरे स्मार्टवॉच पाहूया. बोटस्टॉर्म नावाचा हा स्मार्टवॉच पर्याय देखील अनेक उत्तम फीचर्ससह बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध ठेवला आहे. सध्याच्या स्मार्टवॉचमध्ये जेवढ्या अद्ययावत सुविधा तेवढ्या त्याचा दर्जा उच्च. आणि कुरणा काळापासून सगळी लॉक फिटनेस फ्रिक झाली असल्याने फिटनेस उत्तम ठेवण्यासाठी या स्मार्टवॉचमध्ये विविध पद्धती देण्यात आल्या आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 9 स्पोर्ट्स मोड असून, या स्मार्टवॉचच्या मदतीने फोन कॉल, नोटिफिकेशन, मेसेज अलर्ट, घड्याळाचा अलार्म आणिविशेष गोष्टीचे रिमांयडर या गोष्टी एका स्मार्टवॉचने मॅनेज करू शकतो. तसेच शरीराला विश्रांती मिळण्यासाठी त्याचा वेलनेस मोड तुमची झोप, हृदयाचा पल्स रेट, रक्तातील ऑक्सिजन पातळीचे परीक्षण जे स्मार्टवॉच करते. विशेष म्हणजे हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ असून बाजारामध्ये त्याची किंमत फक्त 2499 रुपये इतकी आहे.
तिसरे विशेष उल्लेखनीय स्मार्टवॉच आहे ते Noise Color Fit Pro 2 म्हणून आहे. त्यांची डिझाईन अतिशय आकर्षक बनवली गेलेली आहे. यामध्ये टचस्क्रीन 1.3 इंचाची दिली गेली आहे. त्याच सोबत आरोग्य आणि दररोजच्या केल्या जाणार्या अॅक्टिविटी ट्रॅकिंगसाठी 9 पद्धती देण्यात आल्या आहेत. या स्मार्टवॉचसह आपण फोन कॉल, म्युझिक कंट्रोल, मेसेजस, विविध नोटिफिकेशन ऑपरेट करू शकता. या शिवाय शारिरीक हालचाली जसे चालणे, धावणे, योग या सोबत आपल्याला हार्ट रेटची योग्य माहिती मिळू शकते. हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ असून त्याची किंमत 2999 रुपये इतकी आहे.