25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeRatnagiriटेरवमधील धुमसणाऱ्या कोळसा भट्टयांवर छापा

टेरवमधील धुमसणाऱ्या कोळसा भट्टयांवर छापा

वनविभागाने ३० नोहेंबरला टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्टयांवर धाड टाकली.

तालुक्यातील टेरव येथील ग्रामस्थांनी गावातील कोळसा भट्टयांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वनविभागाने टेरव येथील जंगलात धुमसत असणाऱ्या भट्टयांवर छापा टाकला. यात तेथील लाकूडसाठा आणि कोळसा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्टया धगधगत असल्याची तक्रार येत होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला होता. वनविभागाला लेखी निवेदन देत बंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. निवेदन दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा केला जात होता; मात्र ग्रामस्थ कारवाई होण्यासाठी ठाम होते. वनविभागाने ३० नोहेंबरला टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्टयांवर धाड टाकली. या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला आहे; तर टेरव येथील संतोष कदम, बाबूराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

संतोष कदम यांनी विनापरवाना जंगलतोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ४७ घनमीटर लाकूड जप्त केले आहे तर विनापरवाना आणि कोळसा भट्टी लावण्यास बंदी असताना देखील कोळसा भट्ट्या लावल्याप्रकरणी बाबूराव कदम व नागेश कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. येथील परिक्षेत्र वनाधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कोळसा जप्त करण्यात आला असून, कारवाईचा तपशील वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.

भट्ट्या पुन्हा पेटणार ? – टेरव येथे सातत्याने कोळसा भट्टया धगधगत आहेत. गतवर्षीही येथे कोळसा भट्ट्या लागल्या असतानाही वनविभागाने त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे कोळसा भट्टयांबाबत आतापासून टेरव ग्रामस्थ आक्रमक राहिले आहेत. कारवाईनंतर या भट्ट्या शमणार की, त्या पुन्हा धगधगणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular