25.1 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeKhedजगबुडीतील गाळाचा प्रश्न सुटणार, नागरिकांना दिलासा

जगबुडीतील गाळाचा प्रश्न सुटणार, नागरिकांना दिलासा

या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ काढण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात सीआरझेडची परवानगी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापूर्वी खेड जगबुडी नदीतील गाळ काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे खेड बाजारपेठेतील ३५० व्यापारी, ५०० कुटुंबांची पुरापासून सुटका होईल. खेड शहरातील जगबुडी नदीतील भरणे पूल ते समुद्राला मिळणारा नदीकिनारा सीआरझेड सागरी प्रभाव क्षेत्रात मोडतो. पावसाळ्यात पूर परिस्थितीत समुद्राचे पाणी ज्या ठिकाणापर्यंत येते त्या भागापासून पुढे ५०० मीटरपर्यंत असलेला सर्व भाग सीआरझेडमध्ये येतो. या परिसरात जगबुडी नदीचा प्रवाह हा खेड शहरापासून जवळच असल्याने पावसाळ्यात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड शहरात शिरते.

याबाबत येथील व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजेश्री मोरे यांची भेट घेऊन गाळ काढण्यासाठी पाठपुरावा केला होता; मात्र सीआरझेडच्या परवानगीशिवाय गाळ काढणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. जगबुडी नदीतील गाळ काढला न गेल्यामुळे शहरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळावी म्हणून खासगी एजन्सीमार्फत नदीची पाहणी करून अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

महिन्याभरात परवानगी मिळण्याची शक्यता – नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेड कायद्याची येत्या महिनाभरात परवानगी मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. सीआरझेड परवानगी मिळाल्यानंतर जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करून यांत्रिक विभाग अलोरे यांच्याकडील यंत्रसामुग्रीने गाळ काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular