26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunमोदींच्या नेतृत्वाखाली दलित समाजाची प्रगती - रामदास आठवले

मोदींच्या नेतृत्वाखाली दलित समाजाची प्रगती – रामदास आठवले

मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाची प्रगती होत आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाचे प्रश्न सुटत असल्यामुळे आगामी निवडणुकीत आरपीआय देशात एनडीएबरोबर आणि राज्य महायुतीबरोबर राहील, अशी माहिती केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. कोकण विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात आज ते बोलत होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “देशातील दलितांचे प्रश्न मोदी सरकारच्या माध्यमातून सुटत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाची प्रगती होत आहे. त्यामुळे आरपीआय पक्ष देशात आणि राज्यात भाजपबरोबर राहील. भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केली जात आहे. ही आघाडी एनडीएसमोर टिकणार नाही.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ३२५ अधिकहून जागा जिंकू. मराठा समाजाला पाहिजे. अशी पहिली मागणी मी केली आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा, अशी पहिली मागणी माझी आहे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील तरुणांना आरक्षण मिळाले पाहिजे, या समाजाची मागणी रास्त आहे; पण आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंदोलकांवर लाठीमार करणे चुकीचे आहे. पोलिसांनी लाठीमार केला, हे खरे आहे; परंतु सरकारच्या आदेशाने लाठीमार केला हे चुकीचे आहे. पोलिसांनी तेथील स्थिती पाहून लाठीमार केला आहे. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकशीतून योग्य ते निष्पन्न होईल आणि दोषींवर कारवाई होईल.’ “सामाजिक न्याय खात्यामार्फत कोकणसाठी आवश्यक ते अनुदान देण्यासाठी प्रयत्न आहेत. येथील तरुणांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी लागणारे प्रशिक्षण देणे, सवलती , देणे, तसेच जास्तीत जास्त तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. दलित समाजातील तरुणांनी रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हायला पाहिजे. नवीन नेतृत्व तयार व्हायला हवे. सहकारच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ घेऊन तरुणांना आपला विकास साधता येणे शक्य आहे, असेही त्यांनी सागतिले.

RELATED ARTICLES

Most Popular