27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRajapurपशुपालन वाढीसाठी पशु किसान क्रेडिट योजना

पशुपालन वाढीसाठी पशु किसान क्रेडिट योजना

योजनेंतर्गत बँकांकडून शेतकऱ्यांना गाई-म्हशींचा चारा, शेळी-मेंढी, कोंबडीपालन आणि देखभालीसाठी सुमारे १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध.

व्यवसायिक दृष्टिकोनातून शेती उद्योगाच्या जोडीने पशुपालन करणऱ्यांची संख्या कमी आहे. उत्पन्नाच्या तुलनेमध्ये मेहनत जादा असल्याने त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. अशा स्थितीमध्ये शेती उद्योगाच्या जोडीने पशुपालन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सहाय्य करणारी केंद्र शासनाने ‘पशु किसान क्रेडिट योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बँकांकडून शेतकऱ्यांना गाई-म्हशींचा चारा, शेळी-मेंढी, कोंबडीपालन आणि देखभालीसाठी सुमारे १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या पशु वैद्यकीय विभागातर्फे या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पशुधन अधिकारी डॉ. किनरे यांनी केले आहे. गाई-म्हैशींची संख्या कमी झाली आहे. त्यातून उत्पन्नाच्यादृष्टीने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा राहिलेला नाही. मात्र, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केल्यास त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून गाई-म्हैशींचा चारा, शेळी-मेंढी, कोंबडीपालन आणि देखभालीसाठी केंद्र सरकारने ‘पशु किसान क्रेडिट योजना’ सुरू केली आहे.

अर्ज कसा व कोठे करायचा ? – पशु किसान क्रेडिट योजनेचा लाभ घेण्यासाठी पशु चिकित्सा दवाखान्यात अर्ज उपलब्ध आहेत. सुमारे एका पानाचा हा अर्ज असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर पशुचिकित्सा रुग्णालयात द्यावा लागतो. ऑनलाईन अर्जही करता येतो. अर्जाची शहनिशा केल्यानंतर बँकेकडून पशु किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

असे मिळते कर्ज – एका गाईचा चारा, पालन पोषणासाठी १२ हजार १५ हजार एका म्हैशीचा चारा, पालनपोषणासाठी,शेळी पाळी-मेढी खरेदीसाठी. ४ हजार एका कोंबडीसाठी.

RELATED ARTICLES

Most Popular