शहरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून काहींना रंगेहात पकडले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर जिल्हा अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा तसेच चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली असून संबधितांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. चिपळूण शहरात मध्यवर्ती ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन गेले काही महिन्यांपासून हा वेश्याव्यवसाय सुरू होता.
यामध्ये एक महिला तसेच त्याचे साथीदार पुरुष एजंट देखील समाविष्ट होते. बिनदिक्कत सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याची खात्री पटवण्यासाठी गेले दोन दिवस पोलीस नजर ठेवून होते. पूर्ण खात्री झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अशी सर्व टीम शुक्रवारी संध्याकाळी संबंधित जागेवर पोहचली आणि गुप्तपणे सापळा रचला.
ठराविक फ्लॅटमध्ये छापा टाकताच त्याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून एक मुख्य महिला तसेच पुरुष एजंट आणि काही. तरुणींचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्वांना चिपळूण पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरू केली आहे. आता हा व्यवसाय कधीपासून येथे सुरू होता, त्यामध्ये कोण कोण आहेत, मुख्य सूत्रधार कोण, याची माहिती पोलीस घेत आहेत.