30 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurनाणारमध्ये बॉक्साईट प्रकल्पासाठी होणार जनसुनावणी

नाणारमध्ये बॉक्साईट प्रकल्पासाठी होणार जनसुनावणी

नाणार परिसरातील सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात येत आहे.

तालुक्यातील नाणार येथे बॉक्साईट प्रकल्प प्रस्तावित असून, या प्रकल्पाच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने २९ ऑगस्टला जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सागवे येथील हायस्कूलच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता जनसुनावणी होणार आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे या बॉक्साईट प्रकल्पालाही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. तालुक्यातील नाणार परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार होती; मात्र या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. विविध आंदोलनांच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी लढा उभारला होता.

ग्रामस्थांच्या प्रकल्पविरोधी आंदोलनांना राजकीय पक्षांनीही पाठबळ देत प्रकल्प विरोध उचलून धरला होता. रिफायनरी प्रकल्पविरोधात नाणार परिसर पेटलेला असताना शासनाला या परिसरात प्रकल्प उभारणीबाबत काहीशी नमती भूमिका घ्यावी लागली होती. पाच वर्षापूर्वी रिफायनरीच्या अनुषंगाने राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा शासनाने केली होती. रिफायनरी प्रकल्प विरोधी वातावरणानंतर आणि ग्रामस्थांनी उभारलेल्या प्रकल्पविरोधी लढ्यानंतर नाणार परिसर चर्चेत आला होता.

नाणार परिसरातील सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात येत आहे. प्रतिवर्ष सुमारे ०.९ मेट्रिक टन बॉक्साईट उत्खनन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. यापूर्वीही नाणार परिसरात बॉक्साईट प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न झाले होते. त्या वेळी ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आता पुन्हा एकदा बॉक्साईट प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला पूर्वीप्रमाणे ग्रामस्थांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular