27.1 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriभातगाव पूलावरून महिलेला ढकलून देणाऱ्या तरूणाच्या मुसक्या आवळल्या

भातगाव पूलावरून महिलेला ढकलून देणाऱ्या तरूणाच्या मुसक्या आवळल्या

आरोपीने तिला भातगाव पुलाच्या कठड्यावरून पाण्यामध्ये ढकलून दिले.

महिलेला निसर्गरम्य अशा भातगाव परिसरात आणत तिच्याकडील दाग, दागिने आणि मोबाईल फोन हिसकावून घेत बेसावधक्षणी तिला भातगावच्या पुलावरून खाड़ीत ढकलून देत पोबारा केलेल्या तरूणाला संगमेश्वर, पोलीसांनी अटक केली आड आहे. नितीन गणपत जोशी (वय २७, मुळ रा. मधलीवाडी, पाचेरीसडा ता. गुहागर आणि सध्या रा. नालासोपारा) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव असल्याचे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. फिर्यादि महिला आणि आरोपी यांची एकमेकांशी चांगली ओळख आणि मैत्री आहे. याच ओळखीतून २२ ऑक्टोबर रोजी आरोपी नितीन जोशी याने तिला आपल्या मुळगावी काम असल्याचे सांगत तुही सोबत चल असे सांगितले. फिर्यादी महिला ओळख असल्याने तयार झाली. आपले दाग, दागिने घेवून ती निघाली.

एका ट्रॅव्हर्ल्सने दोघं २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता गुहागर परिसरात पोहोचली. आरोपी नितीन जोशी याने एका हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची सोय केली होती. तिला त्या हॉटेलवर सोडून तो आपल्या घरी निघून गेला. २२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संशयीत आरोपी नितीन जोशी ही महिला ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तेथे आला. आपल्याला एक जुना मित्र भातगाव ब्रिजवर भेटायला येणार आहे असे सांगत त्याने या महिलेला भातगाव ब्रिजवर आणले. तेथे येताच एका बेसावध क्षणी त्या महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेतले. तिच्याकडे असलेले दोन्ही मोबाईल फोन काढून घेत आरोपीने तिला भातगाव पुलाच्या कठड्यावरून पाण्यामध्ये ढकलून दिले. त्यानंतर आरोपी नितीन जोशी तेथून पसार झाला.

काही स्थानिकांनी या महिलेला वाचवत पाण्यातून बाहेर काढले होते. त्यानंतर त्या महिलेने आरोपी नितीन गणपत जोशी याच्याविरूद्ध रितसर फिर्याद संगमेश्वर पोलीस स्थानकात नोंदविली. त्या आधारे नितीन जोशी विरूद्ध भा.न्या.स.२०२३चे कलम १०९ (१) ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक यादव अधिक तपास करत आहेत. पोलीस निरिक्षक यादव यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. कामेरकर व पो.हे.कॉ. मनर्वल, पो.कॉ. मस्कर यांचे तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. नालासोपारा येथे तो असेल अशी शक्यता होती. त्या अनुशंगाने संगम श्वर पोलीसांचे पथक तेथे पोहोचले. स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी नितीन जोशीला संगमेश्वर पोलीसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून एक अॅक्टीव्हा दुचाकी आणि सोने, चांदीचे दागिने, दोन मोबाईल हॅन्डसेट आंदी एकूण ४ लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, मा. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी यांचे आदेशानें अमित यादव, पोलीस निरीक्षक, संगमेश्वर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/ शंकर नागरगोजे, पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१२७३ मनवल, पोकॉ/१३५६ मस्कर, पोकॉ/२७ खोंदल, तांत्रिक विश्लेषण कक्ष यांचेकडील अमंलदार पोहेकॉ/रनिज शेख, पोकों/ निलेश शेलार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular