26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeKhedलोटे एमआयडीसी हादरली ! पुष्कर कंपनीच्या गोदामाला आग

लोटे एमआयडीसी हादरली ! पुष्कर कंपनीच्या गोदामाला आग

दोन महिन्यात पुष्कर कंपनी मधील दुसरी दुर्घटना आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी केमिकल इंडस्ट्री असलेल्या एमआयडीसी असलेल्या लोटे येथील पुष्कर पेट्रोल प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला गुरुवारी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत पुष्कर कंपनीतील ३ कामगार जखमी झाले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. त्यांना जवळच्या घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

या दुर्घटनेत आकाश कुमार (वय २८), रविंद्र मंडल (वय ४५), संदीप मंडपी (वय ५०) हे तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोटे लवेल येथील घरडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सांगण्यात आले. इथेनॉल ऑक्साइड ट्रान्स्फर करताना वॉल ऑपरेट करण्यात काहीतरी गडबड झाली त्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इथेनॉल ऑक्साइड लिकेज झाल्यामुळे पुष्कर कंपनीच्या गोदामात ही आग लागल्याचा अंदाज आहे दोन महिन्यात पुष्कर कंपनी मधील दुसरी दुर्घटना असल्याची माहिती या परिसरातील काही नागरिकांनी दिली आहे.

लोटे एमआयडीसीमधील केमि कल कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याची नागरिकांची मागणी आहे. विशिष्ट केमिकलने भरलेले ड्रम्सचे ब्लास्ट झाले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, लोटे एमआयडीसीचा अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. तासाभरात आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. दरम्यान याबाबत पोलीस स्थानकात कोणतीही नोंद गुरुवारी सायंकाळपर्यंत करण्यात आली नव्हती. रात्री गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

RELATED ARTICLES

Most Popular