26.5 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeMaharashtraसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष निर्देश

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष निर्देश

सार्वजनिक बांधकाम विभागाची विहित कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत व त्यांच्या कामाचा ताण हा इतर अधिका-यांवर पडत असल्याची गंभीर बाब यावेळी मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आली.

सार्वजनिक विभागाचे अनेक अधिकारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. तसेच काही अधिकारी हे त्यांच्या सोयीनुसार त्यांना पदस्थापना मिळावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. परंतु यापुढे अशा कर्मचारी अधिका-यांवर कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता जे अधिकारी बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत अशा अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

सार्वजनिक विभागाच्या अधिका-यांची आढावा बैठक संपन्न झाली. याबैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिका-यांच्या कामाचा व त्यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेतला. तसेच बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेचाही आढावा घेतला. या बैठकीच्या प्रसंगी अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची विहित कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत व त्यांच्या कामाचा ताण हा इतर अधिका-यांवर पडत असल्याची गंभीर बाब यावेळी मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आली.

या गंभीर विषयांची मंत्री चव्हाण यांनी दखल घेत जे अधिकारी – कर्मचारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजु होणार नाही व आपल्या कामाचा पदभार स्वीकारून काम करणार नाहीत. अशा अधिकारी- कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी याच बैठकीतच दिले.

रस्त्यावरील खड्यांचा विषय हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी चालढकल करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुडविण्यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात यावे. तसेच खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी कामाची गती वाढविणे गरजेचे असून जी कामे सध्या अपूर्ण आहेत ती काम आता युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत संबंधित अधिका-यांना दिले.

RELATED ARTICLES

Most Popular