26.6 C
Ratnagiri
Tuesday, December 16, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeRatnagiriसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे महामार्गाबाबत निर्देश

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे महामार्गाबाबत निर्देश

या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिका-यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावीत. महामार्गावरील अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू वडखळजवळ टप्पा क्र.२, आदि रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणचे कामच्या सदयस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला. ही सर्व कामे तांत्रिकदृष्टया कशा पध्दतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २.०० कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.

या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. त्यामुळे लवकरच हे रस्त्यांचे काम्काम्ज पूर्णत्वाला जाण्याचे संकेत दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular