24.6 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedमुंबई गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या रांगा…

मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या रांगा…

वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा प्रवासी व वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तब्बल दोन ते तीन तास प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. मुंबई गोवा महामार्गाचे सुरू असलेले काम आणि परिणामी या ठिकाणी झालेला अरुंद रस्ता तसेच नियमांचे उल्लंघन करून पुढे जाणारे वाहन चालक यामुळे वाहतूक कोंडी अधिक जटील झाली होती. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अनेक जण कोकणाकडे फिरण्यासाठी निघाले होते. मात्र मुंबई गोवा महामार्गामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला. इंदापूर व माणगाव येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास दोन ते तीन तास वाहन चालकांना व प्रवाशांना खोळंबावे लागले.

बेशिस्त वाहन चालक – अनेक वाहनचालक हे मार्गिका सोडून पुढे जात होते. तर काही वाहने हे दुसऱ्या मार्गेकवर जात होते. त्यामुळे वाहनांच्या जवळपास दोन ते पाच लेन झाल्या परिणामी पुढून येणाऱ्या वाहनींना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच जाटील झाली. याबरोबरच वाटेत अनेक जणांची वाहने एकमेकांना धडकली देखील, यामुळे काही वाहनचालकांमध्ये भांडण देखील झाले. तसेच काही वाहने बिघडली देखील.

अनेक वर्षापासून रखडपट्टी – तब्बल 16 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किमी या पहिल्या टप्प्याचे सुरु झालेले काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद होतो. शिवाय अनेक ठिकाणी डायव्हर्जन देखील आहेत. परिणामी महामार्गावर वाहने वाढल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. कोंडी लवकर सोडवण्यासाठी महामार्गाचे काम जलद पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांकडून व नागरिकांकडून होत आहे.

रुग्णवाहिकेला सुद्धा अडथळा – या वाहतूक कोंडीमध्ये अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. सर्व ठिकाणी वाहने थांबल्यामुळे रुग्णवाहिकेस कोणत्याही बाजूने जाण्यास मार्ग उरला नव्हता. खूप वेळ या रुग्णवाहिका सायरन वाजवत एकाच ठिकाणी उभ्या होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular