27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeRatnagiriशिंदे गटाच्या सेनेचे नूतन जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांची नियुक्ती

शिंदे गटाच्या सेनेचे नूतन जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांची नियुक्ती

राहुल पंडीत हे एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने हा उद्धव ठाकरे गटात असलेले आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आता शिवसेना संघटनेत काही नियुक्त्या करून लवकरच जाहीर सभाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या तयारीसाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गट एक्शन मोडवर आहे, अजूनही काही नियुक्त्या करण्यात येण्याची शक्यता आहे. राहुल पंडित हे शिवसेनेचे रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. तर आमदार राजन साळवी याचे खास मानले जायचे ते शिंदे गटात सामील झाल्याने आमदार राजन साळवीना हा एक प्रकारचा धक्काच समजला जात आहे.

शिंदे गटाच्या सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष राहुल पंडित हे नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या सेनेचे नूतन जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले, उद्योग मंत्री म्हणून आपल्याला आपले मंत्री उदय सामंत हे आपल्याच जिल्हयातील मिळाले आहेत; त्यामुळे युवकांसाठी पहिला रोजगार मिळवून देणारा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. कोकणात रत्नागिरी जिल्हयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट एक्शन मोडमध्ये आला असून, रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राहुल पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल पंडीत हे एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने हा उद्धव ठाकरे गटात असलेले आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

उदय सामंत यांना उद्योगमंत्री पद देऊन एकनाथ शिंदे गटाला जिल्हयात बळ देण्यात आले असून रामदास कदम एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत. दोन दिवसांनी आदित्य ठाकरे यांचा जिल्हा दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आलेली नियुक्ती महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे कोकणात रत्नागिरी जिल्हयात उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दणका बसला असून दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular