24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSportsदक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी के. एल. राहुलची कर्णधारपदी निवड

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी के. एल. राहुलची कर्णधारपदी निवड

भारताचा नवनिर्वाचित एक दिवसीय कर्णधार रोहित शर्मा याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे, दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेला तो दिसणार नाही आहे. त्याच्या जागी फलंदाज के. एल. राहुलची कर्णधारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

अखिल भारतीय निवड समितीने १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुक्रवारी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये भारताचा नवनिर्वाचित एक दिवसीय कर्णधार रोहित शर्मा याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे, दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेला तो दिसणार नाही आहे. त्याच्या जागी फलंदाज के. एल. राहुलची कर्णधारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

‘‘रोहित अजून तंदुरुस्त झालेला नसून मैदानावर परतण्यासाठी अपार मेहनत घेत आहे. आम्हाला त्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही. राहुलला भविष्यासाठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याने याआधी कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. तो या संघाला योग्य पद्धतीने सांभाळेल याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे,’’ असे बीसीसीआय मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सांगितले.

रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे प्रमुख डावखुरे अष्टपैलू खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तसेच पहिल्या कसोटीत आठ गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उपकर्णधारपदाची धुरा त्याचा साथीदार, जसप्रीत बुमराच्या खाद्यावर देण्यात आली आहे.

त्यामुळे सध्याचा दक्षिण आफ्रिकेला जाणारा संघ पुढीलप्रमाणे आहे. के. एल. राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश केला गेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular