26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeRatnagiriमतदानाच्या दिवशी कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्या फुल्ल

मतदानाच्या दिवशी कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्या फुल्ल

लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. कामानिमित्त मुंबईत असलेला चाकरमानी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. सात मे या दिवशीच्या कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत तर महत्त्वाच्या गाड्यांची प्रतीक्षायादी दोनशेच्यावर झाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणारा चाकरमानी कुणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, यांची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातील लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे.

महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या मतदार संघात अटीतटीची लढत होणार, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. अशावेळी चाकरमान्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष सर्व शक्ती पणाला लावण्याची शक्यता आहे.

यासाठी रेल्वेगाड्यांचे बुकिंग करून चाकरमानी मतदानासाठी कोकणात पाठवण्याची तयारीही सुरू झाली आहे. यापूर्वीही झालेल्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारे ट्रेन व एसटीचे बुकिंग झाले होते. मतदान होणाऱ्या सात मे -या दिवशी रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. काही गाड्यांची, तर प्रतीक्षायादीही बंद केल्याचे तर काहींची प्रतीक्षायादी दोनशे पार झाली आहे. कोकणकन्या २१५, जनशताब्दी २५६, तुतारी एक्स्प्रेस १९७, मांडवी एक्स्प्रेस १९३, एलटीटी मडगांव १३३, नेत्रावती १२२, मत्स्यगंधा ८३ अशी प्रतीक्षायादी आहे. खासगी बसचेही बुकिंग करण्यात येत असून, त्यांचे दरही वाढले आहेत. पंधराशे ते तीन हजार रुपयांपर्यंत दर असल्याचे सांगण्यात येते.

RELATED ARTICLES

Most Popular