27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeChiplunइंजिन बिघाडामुळे रेल्वे गाड्या विलंबाने, चाकरमान्यांचा खोळंबा

इंजिन बिघाडामुळे रेल्वे गाड्या विलंबाने, चाकरमान्यांचा खोळंबा

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसनियमित मार्गातून बाजूला करण्याच्या कामात जनशताब्दी एक्स्प्रेस तीन तास रखडली.

दिवा ते सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन निवसर ते आडवली या टप्प्यात बिघडल्यामुळे बुधवारी (ता. ३०) सायंकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना फटका बसला. यापैकी जनशताब्दी एक्सप्रेस तीन तासापेक्षा अधिक तर तेजस एक्सप्रेस दोन तास विलंबाने धावत होती. एकूण पाच गाड्यांचे वेळापत्रक यामुळे बिघडले. यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार दिवा ते सावंतवाडीदरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी ही बुधवारी सुमारे तीन तास उशिराने धावत होती. मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळच्या सुमारास आडवली स्थानकानजीक आली असता दिव्यावरून सावंतवाडीला जाण्यासाठी आलेल्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडले. त्यामुळे जनशताब्दी अडकून पडली.

थांबलेली दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसनियमित मार्गातून बाजूला करण्याच्या कामात जनशताब्दी एक्स्प्रेस तीन तास रखडली. दिवा ते सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्यामुळे आधीच विलंबाने धावत असलेली गाडी सावंतवाडीच्या दिशेने पाच तास ३९ मिनिटे इतकी उशिराने धावत होती. इंजिन बिघडलेल्या या गाडीशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस वरून त्रिवेंद्रमच्या दिशेने धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस जवळपास दोन तास उशिराने धावत होती. पनवेल ते सावंतवाडीदरम्यान धावणारी विशेष गाडी या घटनेमुळे सहा तास उशिराने धावत होती. मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेसदेखील एक तास ५३ मिनिटे विलंबाने धावत होती.

चाकरमान्यांचा खोळंबा – दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्यामुळे मुंबईकर चाकरमानी कोकणाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. वातावरणातही उष्मा असल्यामुळे प्रवाशांची कसरत सुरू आहे. या परिस्थितीत अचानक गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे ऐन दिवाळीत चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता.

RELATED ARTICLES

Most Popular