26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeKokanकोकणवासियांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडी

कोकणवासियांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडी

कोकण आणि गोवा येथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येतात. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने किती प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल होतात याकडे लक्ष लागून आहे. जरी एसटी बंद असली तरी अनेक जण खाजगी वाहन अथवा रेल्वेच्या प्रवासाला प्रथम पसंती दर्शवितात.

रेल्वे प्रशासनाने सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणकरांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. रेल्वे विभागाकडून ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील अजमेर ते गोव्यातील वास्को द गामा जंक्शन दरम्यान विशेष गाडी सुरु केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून जाताना या गाडीला खेड, चिपळूण,  रत्नागिरी,  वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर थांबा असणार आहे. कोरोना काळामध्ये एकतर रेल्वे सेवा बंदच ठेवण्यात आली होती, अनेक गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. ख्रिसमसला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त प्रमाणात असते, ट्रेनमध्ये गर्दी होऊ नये आणि  प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ही स्पेशल रेल्वेने सुरू केली आहे.

नवी वर्षाचे स्वागत तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ही गाडी आठवड्यातून एकदा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (09619-09620) ही गाडी अजमेर ते वास्को द गामा जंक्शन दरम्यान येत्या २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन शनिवारी सकाळी नऊ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजता गोव्यामध्ये पोहोचण्याचा मानस आहे. साधारणपणे हा एक दिवस म्हणजेच २४ तासांचा प्रवास असणार आहे. ती अजमेरवरून येताना कोकण रेल्वे मार्गावर खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर थांबणार असल्याने प्रवाशांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular